Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

4.5  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

आजची हिरकणी

आजची हिरकणी

4 mins
312


किल्ले रायगडाच्या खाली काही अंतरावर वाकुसरे (वाळूसरे) नावाचे एक छोटेसे गाव होते. त्‍या व्‍यक्‍ती एक धनगर व्‍यक्‍तीचे कुटुंबीय राहत होते. ती व्यक्ती समवेत त्याची आई, बायको हिरा व त्यांचे एक तान्हे बाळ रहात होते. दूध विकून संपूर्ण पैश्यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते. त्याची बायको रोज गडा वर  दूध विकायला जात असे. एके दिवशी रोजच्याप्रमाणे हिरा दूध विकायला गेली, पण तिला काही कारणाने समोरला उशीर झाला. ती गड्ड्या दरवाजांजवळ आली होती, पण पाहते तर काय दारे बंद होते. गडकऱ्यांना त्यांनी फार विनंती केली, पण त्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. कारण देवासमोर उघडले सूर्यास्त बंद कि, ते पुन्हा स्वतःच उघडत. आज्ञांची आज्ञा लागू होती. सुरेल मुभा नसे. पण तान्ह्या बाळाची चिंता आपली होती. आईवाचून ते तान्हे बाळ रात्रभर कसे राहील ह्या विचाराने आईची चिंता वाढ ली. या  विचारातच हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. अंधारात कड्या पासून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्या सारखे  होते. कारण सर्व दऱ्या, दाट झाडे-झुडपे आणि अंधार. पण बाळाच्या प्रेमापोटी ह्या मातेने हा निर्णय घेतला.आणि गड उतरून खाली आली.आई ती आईच असते आपल्या लेकरा साठी आपला जीव पण पणाला लावू शकते.अशीच एक आधुनिक हिरकणी

तिची ही कथा..


सगळ्या देशा वर कोरोना चे संकट थैमान घालत होते.जो तो आपल्या कामाच्या चिंतेत होता.बाहेर पडायला ही लोक घाबरत होती.जीव मुठीत धरून घरात बसून होती.लहान मूल,वृध्द लोक जास्त घाबरून गेली होती.

किशोर ही उद्याच्या काळजीत होता.होते तेवढे पैसे थोडे थोडे वापरले आता उद्या काय करायचे हा मोठा प्रश्न त्याच्या समोर होता.तो एक एस टी कंडेक्टर होता. कोरो ना मुळे बसेस एसटी बंद होत्या.मोजक्याच गाड्या चालू होत्या पण किशोर ला कामा वर बोलवले नव्हते.आपले काम राहते की जाते हे पण त्याला माहित नव्हते.त्याच्या घरात आजारी आई,एक चार वर्षाची मुलगी होती.त्यात अजून भर म्हंजे त्याची बायको सावित्री पुन्हा गरोदर होती.काम नाही काही आणि खाणारी तोंड मात्र वाढत चालली होती.सावित्री म्हणत होती,मी काहीतरी शिलाई चे काम बघते होईल सगळ नीट.लोकांना नवस उपवास करून सुद्धा मुल होत नाहीत.आपल्याला देवाने दिले आहे मुल तर ते नाकारायचे नाही.किशोर काही बोलला नाही मग.

सावित्री ला नववा महिना लागला होता. अशातच एक दिवस किशोर ला ताप आला,त्याने चेक केले तर तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला.खूप औषध उपचार केले पण त्याला गुण आला नाही किशोर चे निधन झाले.


सावित्री वर आभाळ कोसळले.त्यातच तिला प्रसव वेदना चालू झाल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला.कसे तरी सावित्री दिवस काढत होती अधून मधुन किशोर च्या कामा वर जावून तिला कामा वर घेतात का याची चौकशी करू लागली. कोरोना मध्ये किशोर गेला म्हणून सावित्री ला त्याच्या जागी कंडेकटर म्हणून कामा वर घेतले. कोरोना आता संपत आला होता. कामधंदे चालू झाले होते.

सावित्री खूप खुश झाली.घरी येवून सासू ला ही बातमी दिली.पण आता प्रश्न हा होता की तिच्या लहान तीन महिन्याच्या बाळाला ठेवायचे कुठे? आजारी सासू कसे बसे मुली कडे लक्ष देत होती.पण या लहान बाळाला कोण बघणार.,मुळात त्याला आई च्या दुधाची गरज आहे,ती कशी भागणार? इतक्या अडचणी च्या काळात ही नोकरी मिळाली आहे ती सोडायची नाही अस तिने ठरवले.आपल्या सोबत बाळाला ही घेवून जायचे असे तिने ठरवले.सावित्री मग कामा वर रुजू झाली. वरिष्ठांची परवानगी घेवून ती बाळाला सोबत घेवून येवू लागली.आपले काम बघत एस टी मधील बायका कडे थोडा वेळ बाळाला देत असे. बाळ रडू लागेल की त्याला एस टीतच दूध पाजू लागली. इतर बायका तिला सहकार्य करत.तसेच तीच कौतुक ही करायच्या.इतक्या लहान बाळाला घेवून ही बाई आपले काम ही सचोटीने पार पाडते,ही कौतुकाची आणि अभिमानाची बाब होती.

बाळाला दुधाची गरज होती.आई पासून बाळ दूर राहू शकले नसते म्हणून सावित्री ने हा जगा वेगळा निर्णय घेतला आपल्या बाळाला तिने आपल्या दुधा पासून वंचित नाही ठेवले.सावित्री ही खरी आजची सावित्री होती.ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आजची हिरकणी होती. बाळा साठी,त्याच्या दुधा साठी अनेक अडथळे विनासायास पार करत होती.सावित्री प्रत्येकाच्या कौतुकाचा भाग बनली होती.

सोलापूर एस टी मध्ये अशीच एक महिला कंडेक्टर आहे,की बाळाला घेवून प्रामाणिक पणे आपेल काम करत आहे.त्याच तिच्या कहाणी वर आधारित माझी ही माझ्या शब्दातली कथा.सावित्री ही आजची.आजची आई बाळा साठी त्याच्या दुधा साठी अशा अनेक अडचणी तून मार्ग काढत जात असते.आजची प्रत्येक काम करणारी महिला ही खरी हिरकणी आहे.अशा तमाम मातांना शत शत प्रणाम.


(समाप्त) 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract