Bhagyashri Chavan Patil

Action Inspirational Others

4.0  

Bhagyashri Chavan Patil

Action Inspirational Others

आबांचा शुर छावां

आबांचा शुर छावां

2 mins
156


शिवपुत्र संभाजी राजे म्हटलं की तुमचाच चेहरा समोर येतो..तुमच्या सारखा मावळा पाहिला की अंगावर काटा उभा राहतो..खरंच मागच्या जन्मी जणू तुम्हीच राजच रूप असाल असा विश्वास वाटतो..तुमच्या सारखा अस्खलित कलावंतपहिला की उर अभिमानाने भरून येतो तुमची व्यक्तिरेखा साकारत सह कलाकार ही जिवाचं रान करताना दिसतो..

   अवघ्या काहीं तासांचा कार्यक्रम मनात जसाच्या तसा घर करून राहतो.थरारून टाकणारे दृष काही काळासाठी अगदी शांत करून जातो घोड्याच्या टापांचा आवाज ऐकताच ओठी एकच नावाचा जय जयकार होतो.. तुमच्या मनातले ध्येय निश्चितच पूर्ण होणार याची श्रींकडे प्रार्थना करतो..लहान मुलांच्या मध्ये आज ही शंभू बाळाचा हसतानाचा चेहरा आपोआप समोर उभा राहतो काय कीर्ती असेल माझ्या राजाची की त्यांनी या जन्मी आबा साहेबांचा शुर छावा दिसतोतुमचं हे स्वप्न जगताना पाहून लहान लेकरू

सुद्धा तुम्हाला भेटलं की नतमस्तक होतो..

  अद्भुत दिमाखदार नयनरम्य सोहळा डॉक्टर अमोल कोल्हे सर आणि जगदंब क्रियेशन टीम यांचे उल्लेखनीय सादरीकरण आणि लाखो लोकांचा समुदाय याचाच एक भाग होवून साक्षात रौद्र रूप शंभू राजे यांना पाहणं म्हणजे पर्वणी आहे मराठा असल्याचा अभिमान आणि उर अभिमानाने भरून येतो अंगावर सतत येणारा शहारा आणि महाराजांना कैद केल्यानंतर येणारे अश्रू काही और च असतात तसच उभेहुब साकारणं आणि पुऱ्या टीमचे शर्थीचे प्रयत्न सगळचं काही सांगून जातात 

  तुमच्या या शिव भक्तीला आणि आजच्या ते पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढी पर्यंत तुम्ही संस्कार करत आहात याचा सार्थ अभिमान आहे.. तुमच्या या सेवेला माझा मनापासून मानाचा मुजरा कधीही न विसरता येणारा हा धगधगता इतिहास कायम आठवणीत राहील आणि त्याच्या आमच्या आयुष्यात कसं आत्मसात करू याकडे नेहमी कल राहिलं 


Rate this content
Log in

Similar marathi story from Action