Bhagyashri Chavan Patil

Classics

2  

Bhagyashri Chavan Patil

Classics

अगदी सहज..!!

अगदी सहज..!!

4 mins
215


              खुप दिवस झाले आपलं असं बोलणंच नाही झालं म्हणुन थोडंसं जगाला बाजूला ठेवून स्वतः मध्ये काही सापडतं का हा प्रयत्न मी करणार आहे.. माहीत नाही का माणूस अपेक्षेच्या ओझ्याखाली इतका असतो की आजच जगणं तो विसरून जातो असं मला वाटतं आपल्याला जे हवं असत ते वेळ आल्यावर आपल्याला मिळाल्या शिवाय राहत नाही.. कारण जे हव असतं त्याला स्वार्थ (आकर्षण) अस म्हणतात आणि जे आपसुक पदरात येवुन पडत त्याला देणगी असं म्हणतात कारण ज्यात काही स्वार्थ नसतो ते आपल्यासाठी खास असतं. आपल्याला पाहिजे म्हणजे कुठे तरी जावून आपल्याला त्याची जाणीव होते आणि ते कळायला लागतं समजून घ्यावं वाटत तेव्हा कुठे ती फक्त सुरुवात असते.. कारण नंतर जे घडणार असतं त्याची सुरुवात जाणते किंवा अजाणतेपणे होत असते कारण आजु बाजूला इतकं काही घडतं असत की, आपल्या सोबत का बर असं होत नाही याचा विचार आपण करत बसतो पण सगळं काही वेळ आल्यावर घडतं फक्त त्या वेळे पर्यंत धीर ठेवून आपण जायला हवं.. काही वाटा अवघड किंवा अशक्य ही वाटतात पण त्या ही होऊन जातात.

              म्हणून कधीही आयुष्य पूर्णत्वास नेण्यासाठी खुप साद सोप्पं आणि सरळ जगायला हवं असं मला वाटतं आज खर तर काही पाहण्यात आलं आणि काही विचारात आणि वाचण्यात आलं म्हणुन वाटलं की बोलून कधी कुठे तरी मोकळं व्हावं कारण सगळच जाऊदे म्हणून सोडून देता येत नाही कधी कधी बालिश पणा करावासा वाटतो तर कधी मनात नसताना ही काही गोष्ठी करव्या वाटतात तर काही अगदी सहज होऊन जातात. कधी काही मिळत जुळत वाटलं की गालावरून ओघळत येणार पाणी ही सुखावणारं असतं कारण ते सहजपणे बाहेर आलेलं असतं जेव्हा आपण आपल्याला नव्याने भेटत जातो बरं दाखवणारी प्रत्येक गोष्ट ही काल्पनिक कथा नसते काही खऱ्या तर काह भासवणाऱ्या असतात जिथे सगळच काही छान गवसेल असं वाटत पण होत काहीच नाही..

          कवितेच्या रुपात खूप काही नाही पण थोडंसं मनातलं गुपित बाहेर येत तर काहीं मनाच्या तळाशी जाऊन बसलेले असते जे काही केल्या बाहेर काही येत नाही त्यामुळेच तर माणूस कठोर वाटत जातो आणि परिस्थिती नुसार त्याला व्हावं लागतं उगाच नाही मुखवटा हा प्रकार अस्थिवात आला त्याला ही काही कारण असेल म्हणूनच ना.. मेरा नाम जोकर मध्ये सुद्धा त्याची परिस्थिती काहीतरी वेगळीच असते पण जगासमोर त्याला दुसऱ्याला हसावायच काम दिलेलं असतं पण सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच असते आपण म्हणतो तस आयुष्य सोप्पं ही आहे त्याला वेगवेगळे पैलू आहेत जे आपण लक्ष देवून पाहायला हवं तरच ते मिळत आणि त्याचा खर अर्थ कळतो.. आता मला माहित नाही मागचा जन्म असतो की काही पण हां पाप पुण्य याची नोंद होत असेल किंवा कर्म चक्र असेल अस म्हणतात तिथे काही माणसे भेटली असतात किंवा काहीची काम मनातलं बोलायचं राहिलेले असतं नाहीतर काह माणसे आयुष्यात येतात आपला जीव की प्राण बनतात आणि एकदम निघून जातात त्याच ही कारण आहे का अशी माणसे निघून जातात तर त्यांचं कर्म चक्र तिथेच पूर्ण झालेलं असतं 

              म्हणून एखादा माणूस अनुभव असा येतो ज्याचा अर्थ लागत नाही मग त्याच ही कारण तसच असेल कारण माणूस म्हणाल की, जे काही उरलं सुरल आहे ते पूर्ण होणारच आहे ज्याचा आपण खूप विचार नाही करायचा काही माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि अचानक सोडून निघून जातात कारण ती फक्त त्या वेळे साठी आलेली असतात म्हणून लग्न ही प्रक्रिया सुरू का झाली असेल तर एका सोबत तरी भेट प्रेम दुरावा भांडण रुसवा फुगवा आणि एक कोणा सोबत सरणार आयुष्य बाईचं बाईपण पुरुषाचं पुरुष पण ह्याला ही काह अर्थ लागुदेत म्हणूनच असेल हे सगळं कशी म्हणजे गेलेली पिढी असुदेत किंवा आताची पिढी असूदेत जोड्या तो बनवतो तो म्हणजे देव वेळ आली की सगळं होत मग वेळ ही लागत नाही मग, हे सर्व खरं असेल तर तर कर्म चक्र हे ही खरचं असेल.. असं फक्त आणि फक्त मला वाटतं कोणी तरी अवलिया ने मला याच उदाहरण देतच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं म्हणुन फक्त कोणी दिलल्याची जाण म्हणुन इथे फक्त लिहून काढलं कारण जे होणार आहे ते होणार मग आजचा विचार सोडून पुढचा विचार नाही करायचा शेवटी आपण स्वतः महत्वाचे विचार यायचे ते येणार पण हे ही तितकेच खरे..

              आज पासून काहीही वाटलं तरी आपण जे मागतो ते मिळत नाही म्हणजे त्या पेक्षा काहीतरी भारी मिळणार हे नक्की कारण कर्ता करविता सगळा तो आहे आणि तो नेहमी चांगल्यातल चांगल असं प्रत्येकाला तो देत असतो ह्या वरचा विश्वास काही केल्या उडू देणार नाही कारण आयुष्यात येणारा प्रत्येक जण त्याला जितका वेळ दिला आहे तितकाच तो राहणार कारण कोणाला मना विरुद्ध आपण थांबवू नाही शकतं आणि जरी ती किंवा तो थांबला अथवा थांबली तरी त्याचा उपयोग हा शून्य असतो कारण नात निभवयाला दोन्ही कडून समान प्रयत्न करायला हवा तरच त्याला अर्थ आहे.. एका बाजूने होणारे प्रयत्न व्यर्थ आहेत जसं की एकतर्फी प्रेम त्याचा ही शेवट दुःख हाच होतो आणि तो त्रास खूप देवु शकतो..


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics