Bhagyashri Chavan Patil

Drama Tragedy

2  

Bhagyashri Chavan Patil

Drama Tragedy

भावनिक रंग

भावनिक रंग

2 mins
57


कधी कधी शरीर मन आत्मा इतका थकतो की काहीच करावसं वाटतं नाही अगदी काहीही नाही.. शरीर थकत कामाने मन थकत विचाराने आणि आत्मा थकतो स्पर्श न झाल्याने हेच आणि असे विचार मनात आले आणि अलगद बोटे इथे येवुन थांबली का तर स्वतःला शोधण्यासाठी नव्याने ओळख सापडण्या साठी अलगद उशीत डोके ठेवून त्या पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी थोड का होईना मन हलकं राहिलं..


असं म्हणतात मान्य केलं की त्रास होत नाही पण सगळच मान्य झालं तर आपण व्यक्ती म्हणुन चुक ठरू शकतो कारण इथे कही एक पटीने मन लाखों पटीने गुंतलेलं असतं कधी झुरत असतं तर कधी सगळच बरोबर छान सुरू आहे म्हणुन जगत असतं.. सुख मानण्यावर असतं असं म्हणतात ते का उगीच?


कारण आपण आपल्याला घडवत असतो नेहमी डोक्याचं एका म्हणतात का ते माहीत आहे कारण हृदय डावी कडे असतं म्हणजे चुकीचं हेच काय ते विज्ञानाला धरून कारण होतं नाहीतर उगाचच म्हणाले असता का उत्तरे सापडत नसली की, मनाच नाही डोक्याचं एका त्याच हे खरं कारण आहे..


जळू ऐकून माहीत नाही पण बघितला नाही कदचित तो माझ्या सारखा असावा म्हणजे गरज नसताना उपयोग नसताना किंमत नसताना चिकटून राहतो काही केल्या सुटत नाही.. प्राणी जीव म्हणून त्याला त्रास होतं नाही पण मला होतो त्याच काय?? दर वेळी काय चुकत असेल माझं की कधी कधी विचारांचं ओझं इतकं वाटतं की सगळच संपलं असं वाटतं राहतं..


सगळं कळतं लख्ख दिसतं पण वळत मात्र नाही असं का होतं असेल देव इतका निष्ठुर नसेल ना की त्याने माझ्या आयुष्यात माझ्या असं हक्काचं कोणी पाठवलं नसेल जे सगळं सुख अगदी भरभरून देईल तेव्हा खरी खुश आनंदी राहील का मी? पण सगळ्यांवर विश्वास ठेवला तर जगायचं कस? सामोर तर जाणार दुसरा पर्याय नाही आहे.. तटस्थ राहायला यायला हवं तरच काही तरी होऊ शकेल काही दा केलेला प्रयत्न करून शांतता मिळणार असेल तर आणखी काय हवं? भावनिक आधाराला काठी लागणं हे साफ चुकीचे आहे त्यातुन फक्त माणूस माणूस राहतं नाही..


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama