Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Bhagyashri Chavan Patil

Inspirational Others


2  

Bhagyashri Chavan Patil

Inspirational Others


कवडीमोल झाले जगणं..

कवडीमोल झाले जगणं..

6 mins 120 6 mins 120

          कवडीमोड झालं आहे जगणं हो कवडीमोलचं वागणं कोणाला बाहेर जाण्या वाचून पर्याय नाही तर कोणाला फक्त घरात बसवत नाही आहे.. अजुन किती काळ या कठीण दिवसांमध्ये राहायचं आहे कधी थांबणार आहे हा सृष्टीचा हाहाकार मान्य आहे चुक आमची आहे पण आता हे जगणं असह्य होतं आहे आपली माणसे डोळ्यांदेखत दुर निघुन चालली आहेत आणि मागे सर्व तिथेच सोडुन मग बाकीच्यांनी करायचं तरी काय??? ह्या वर कितीही काही बोललं तरी कमीच आहे कारण ज्याचं जळत त्यालाच कळत ह्यातली गत आहे कारण बाकीचे नेटकरी मिम करण्यात व्यस्त आहेत पण हा कोरोना रुपी राक्षसाचा शिरकाव सगळच अनुत्तरीत करून ठेवतो तर काही जण सगळं हसण्यावारी नेत आहेत म्हणजे अजुन कधी कळणार मग मास्क कसा घालायचा आणि अजुन काय करायचे हे सुद्धा शिकवा म्हणून सांगतात खरंच इतकं हसण्यावर नेण्यासारखं आहे शेंबड पोरगं सुद्धा सांगेल कसं वागावं ते आता दीड वर्ष होत आलं रोज उठून तेच सुरू आहे आज एक मास्क आणि उद्या दोन मग तीन तुम्हा सगळ्यांना हे खूप सोप्प वाटत आहे कारण ज्यांच्या घरात ह्याचा शिरकाव होत आहे त्यांनाच त्याच जास्त दुःख आणि गांभीर्य आहे


वाटत तितकं सोपं नाही आहे तो कोरोना रुपी राक्षस काय आपला कोणीच लागत नाही ज्याचा बद्दल तुम्ही सांगत आहात की आम्हाला होणार नाही म्हणून तर असं काहीच नाही आहे आता तरी शहाणं होण्याची गरज आहे जितकं सोप्प आहे म्हणून स्वतःला समजावत आहात तसचं हे कटू सत्य समजून घ्या ह्यात सुद्धा आपल्या सगळ्यांची एकी हवी आहे तरच आणि तरच हा बदल घडवून येईल दिसत म्हणून त्याचे व्हिडिओ आणि चुकीचे मॅसेज पसरवू नका कारण ह्या मुळेच सगळं घडत आहे जेव्हा घरात राहून एक मेकांना भेटता येणार नाही तेव्हा समजेल कारण आता ऑक्सिजन आणि बेड औषध प्रशासन देण्यात कमी पडत आहेत कारण त्यांची टंचाई भासत आहे त्यात त्यांचा कोणाचाही चुकीचा हेतू नाही हो काही ठिकाणी या गोष्टीचा बाजार मांडत आहेत खोटं बोलुन निघुन जात आहेत त्या कडेही काना डोळा करू नका त्याची रीतसर फिर्याद दाखल करा आणि त्याचा छडा लागेल यावर विश्वास ठेवा.. काही जण आपल्याला काही झालं आहे हेच मान्य करायला तयार होत नाही आहे पण ह्या कडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही


आपणच या देशाचे सुजाण नागरिक आहोत मग जबाबदारी सुद्धा आपली आहे जगावरच संकट आहे त्यामुळे त्यातून आपल्याला सगळ्यांना जावं लागणार आहे जमेल तर मदतीचा हात पुढे करा त्याचा गवगवा होणार नाही ह्याची खबरदारी घ्या कारण चांगल्या कामाची पावती त्या कर्ता करविता कडे आपोआप पोहचते आणि त्यातील थोडी खटकणारी बाजू म्हणजे सगळ बंध केलं की सगळी घरात बसत आहेत नाहीतर मग मोकाट फिरत आहेत माफ करा कोणाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही आहे असं वाटले तर मला माफ करा.. पण काय करू? आज राहवत नाही म्हणुन बोलत आहे सत्य कटू असतं अस म्हणतात पण काय करणार सांगितल्या शिवाय कळतं ही नाही आहे मग करावे तरी काय?? हा कोरोना राक्षक अजुन किती जणांचे बळी घेणार आहे परिस्थिती इतकी बिकट आहे की, रडून रडून डोळ्यातले पाणी सुद्धा सुखत चालले आहे बातम्या आणि वाढती रुग्ण संख्या पाहून भीती आणि काळजी वाटत आहे घरात बसल तरी रुग्णवाहिकेचा आवाज ऐकू येत आहे..


काही क्षणासाठी काळजाचा थरकाप उडत आहे कोरोना रुपी राक्षस अजून किती अंत पाहणार आहेस.. काय करू म्हणजे तू निघून जाशील आणि आमचं जगणं सुखकर आनंदमय आणि निरोगी करशील अजुन किती जणांना आमच्या लोकांना दूर करणार आहेस खूप काही गमावतांना आम्ही रोज उठून पाहत आहोत रोज डोक्यावर टांगती तलवार घेऊन जगत आहोत श्रीमंत आणि गरीब काय दोघांची अवस्था तीच झाली आहे.. परत लोक चुकीच्या पद्धतीची काम करत आहेत परत कळतं नकळत चुका होत आहेत म्हणजे हे सगळं असच सुरू राहणार का?? काहीतरी सांग म्हणजे आमच्या मनाची तयारी होईल.. गेले दीड दोन वर्ष कोणतेच सण समारंभ साजरे करता आले नाही आहेत ना कोणी आपल्या घरी सुखी आहेत थोड्या प्रमाणात आहेत पण काहींच्या घरी मात्र स्थिती खूप बिकट आणि भयानक प्रकार आहे ऐकून रोजची झोप उडून गेली आहे भीती कमीच नाही अजुन वाढतच चालली आहे.. मान्य! तुझ्या नावातच रडणं आहे पण अजून किती काळ मंदिरे बंध झाली जत्रा बंध झाली भक्तांची देवाकडे जायची वाट ही तू बंध करून ठेवली आहेस इतकचं काय बाजूच्या घरात काय चाललं आहे ते सुद्धा कळतं नाही आहे..


जन्मतः बाळ सुद्धा तोंडावर मास्क घेवून जन्माला येत आहे काही बाळ तर मास्क ओढून काढत आहे.. बेरोजगरीमुळे सगळीच माणसे हरून आणि थकून गेले आहेत रोजचा दिवस हा सारखा झाला आहे तु आल्या पासून म्हणजेच हा कोरोना रुपी राक्षस काही लोकं खूप जबाबदार आणि शहाणे झाले आहेत सगळ्यांची अवाढव्य अपेक्षा आणि चंगळ मंगळ कमी झाली आहे.. तुझी पहीली च लाट आम्हाला शहाणी करून गेली आहे.. पण हे सगळं चांगलं करून दाखवायला आपली माणसेच उरली नाही आहेत मग एवढं सगळ होवुन उपयोग तरी काय?? नाहीतर एकदा अशी लाट येवुदे की सगळेच एकदाच संपुन जावुदेत म्हणजेच हा रोग नष्ट होईल. नाहीतर रोज ना रोज कोणाला ना कोणाला घेवुन जात आहेत जे आपला जीव धोक्यात टाकून आमची करमणूक करत आहेत जे डॉक्टर नर्स सफाई कामगार कोरोना वॉरियर्स नट नटी वैज्ञानिक शास्त्रज्ञ पोलीस अधिकारी हवालदार आणि खूप असे लोक काही नावं घ्यायची राहून गेली आहेत तर समजून घ्या आणि जे आपली जबाबदारी म्हणून काम मदत करत आहेत आता त्यांचा तरी विचार कर कारण याची खूप गरज आहे. दुरावलेली माणसे डोळ्यांदेखत जवळ आणून त्यांना कायमच आमच्यापासून दूर जाणं थांबुदेत.. एव्हाना त्या दगडाला ही पाझर फुटला असता पण तुला काही केल्या समजत नाही आहे आम्ही केलेल्या चुकांची पुनरावृत्ती आहे असं वाटतं पण त्यातून सुधारण्याची एक संधी दे कारण संधी दिली तर आम्ही ती सुधारून दाखवू कारण आता कितीही पॉझिटिव्ह राहायचं म्हणाल तर तुझं आधी नाव येत आणि मग सगळच रडतं.. सगळं बर आणि छान होईल म्हणुन हा अख्खा देश तु निघून जाशील या आशेवर जगत आहे..


तू काय सगळंच बदलून जातं नाही आहेस काही चांगले बदल ही घडवुन जात आहेस तुझ्यामुळे फक्त आई बाबांच्या डोक्यावरच लग्नाचं ओझ तू उतरवल आहेस आणि कमी कमी करून सुख कसं दारी येत हेही तुच दाखवून दिल आहेस गाजावाजा न करता प्रत्येकाला त्याचा अर्थ विचार आणि हक्क दिला आहेस आता सगळेच लोक एकाच तराजूत गुण्या गोविंदाने नांदत आहेत पण आता त्यासाठी तुला या कोरोना रुपी राक्षस जाणं गरजेचं आहे तुझा हाहाकार सगळ्यांना अद्दल घडवुन चालला आहे आता मात्र तु कायमच आमच्यातून निघून जा मगच आम्ही सुखी होवू.. कारण आता कुठे सण समारंभ सुरू व्हायचे आहेत देवपूजा करणारे भटजी बुवा आम्हाला दिसु देत ढोल पथक वाजवणारे सहकारी आम्हाला दिसु देत परत एकदा पंढरीची वारी शाळा कॉलेज क्लास मैदानी खेळ कामगारांना काम आणि छोटी मोठी दुकाने बाजार पेठ बँका पतसंस्था आणि छोटी व्यवसाय दूर असलेल्या नातेवाईक मित्र परिवाराची भेट होई देत लग्नसराई बॅड बाजा बारात सुरू होऊ देत..गाण्याचे कार्यक्रम आणि खूप काही छान कानांवरती पडू देत सगळेच लोक सुख समाधान आणि समृद्धी ऐश्वर्य मध्ये राहू देत नाटक सिनेमा हॉल मॉल डान्स क्रिकेट आयपिल सुरू होऊ देत..आणि खूप असे सामने खेळले जावू देत उरलेच सगळेच काही सुरू होऊ देत आणि अश्या असंख्य गोष्टी पुन्हा एकदा रुळावर येऊ देत.. घरातील बंध झालेली पाखरे ऊंच ऊंच आकाशात झेप घेऊ देत.. म्हणूनच घरी राहू या आणि या रोगाला कायमच हरवू या हा लेख लिहला आहे सगळं चांगलं परत पहिल्या सारखं होईल हीच सदिच्छा..


Rate this content
Log in

More marathi story from Bhagyashri Chavan Patil

Similar marathi story from Inspirational