Bhagyashri Chavan Patil

Others

2  

Bhagyashri Chavan Patil

Others

शहाणे असाल तर मनाचे कधीच ऐकू नका..?

शहाणे असाल तर मनाचे कधीच ऐकू नका..?

4 mins
120


शहाणे असाल तर मनाचे कधीच ऐकू नका...


    कारण असं गाणं प्रत्येकाने ऐकलं असेल "दिलं तो बच्चा है जी" याची खात्री असेल म्हणुन आज काही बोलायला आली आहे काही दिवसा पासुन एक गोष्ट किंवा एका विशिष्ठ माणसाचं वागणं बोलणं मी बघत होते आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत होते मला आधी वाटायचं दुसरे काहीही बोलतील सांगितलं आपण का म्हणून ऐकायचं आणि विश्वास त्याहून का ठेवायचा म्हणून समोरची व्यक्ती काही बोलेल याची मी वाट पाहत होते पण आज समजत आहे कोणी एक दोघे बोलले ते चुकीचे किंवा आपल्याला त्यांचं म्हणणं पटलं नाही असं मी समजेन पण सगळीच लोकं तेच बोलत आहेत म्हटल्यावर हळु हळु का होईना विश्वास बसायला लागला पहिल्यासारखं रडत कुढत जगणं वागणं बोलणं आता चुकूनही होत नाही कारण जे गेलं ते माझं कधीच नव्हतं आणि जे आहे ते फक्त माझ्यासाठी बनलं आहे याच्यावर विश्वास आहे..


          आजकाल माणसं बदलत जातात काहींच्या आयुष्यात अनेक नवीन लोकं येतात किंवा आपण असल्याची सवय होते आणि ते लोक आपल्याला टाळायला करायला लागतात आधी आपण त्यांचे व्यापून टाकलेले आयुष्य असतो आणि नंतर तू कोण मी कोण होऊन जातो ते आपल्याशी अगदी काहीच घडलं नसल्या सारखं बोललात वागतात पण स्वतःहून कधी साधी विचारपूस ही करत नाहीत किंवा आपण साधी मदतीची अपेक्षा केली तरी तिथे ते काही सेकंद ही थांबू शकत नाहीत आपल्याला सगळं कळतं असतं फक्त आपल्याला वळवून घ्यायचं नसतं आणि तिथेच आपली मोठी चुक होते आणि आपण जास्ती अडकत जातो.. 


      सगळं समोर घडत असतं पण विश्वास काही केल्या बसत नाही पण आज मात्र पटलं कारण एक दोन लोक चुकीची असतात पण सगळेच चुकीचे नसू शकतात तेव्हा मात्र खूप वेळ झालेला असतो आणि स्वतःला सावरण्याची वेळ ही आपल्या वर येऊन थांबते तेव्हा त्या गोष्टीचा जास्त विचार न करता त्या लोकांचे नावं न घेण्याचे व्रत सुरू करा आणि त्या लोकांना माफ करा कारण नाती ही दोन्हीं बाजूंनी टिकवली जातात तरच त्या नात्याला अर्थ आहे मग नातं कोणतंही असो आणि तुम्हाला बदल दिसत असेल तर लगेच त्यांना सतत फोन msgs पाठवायचे बंध करा त्यांचे फोटो पाहत राहणे सोडून द्या परत जरी होय नाही संवाद झाला तर तिथल्या तिथे बोलून विषय थांबवा नाहीतर तुम्ही सुद्धा टाळायला शिका एक दोन दा बोलतील नंतर त्यांनी ही सोडून देतील तेव्हा स्वतःला इतके मोठे बनवा की त्यांना आपण कोणीतरी वेगळच आहोत याचा अंदाज येऊ द्या आणि स्वतःसाठी शहाणे व्हा आणि जमेल स्वतःला होईल तितक लांब घेऊन जा वेग वेगळ्या गोष्टीत स्वतःचे मन रमवा आणि कधीच डगमगल्या सारखे वाटले तर त्यांनी तुम्हाला कसे टाळले हे आठवा दुषणा देऊ नका आणि वाईट ही विचार करू नका कारण ते ही एक वेगळ्या प्रकारचं नातं होऊ शकत म्हणुन सगळेच पाश तोडून तुमचा आणि स्वतःचा विचार करा स्वतः कठोर पावले उचला आणि त्याचा उपयोग कायम स्वरुपी करून घ्या 


      आपण काही दिवसात आणि तासामध्ये माणसं ओळखतो की अमूक हा माणूस असा आहे आणि तमुक हा माणूस तसा आहे मग त्याच्या वागण्या बोलण्यातून नाही का जाणवणार की ते बदलेले आहेत म्हणुन फक्त त्यांनी स्वःताहून या जन्मात तरी आपल्याला तुम्ही नको हे कधीच सांगणार नाहीत आणि हे गौड कायम राहणार आहे जेव्हा तुम्हाला बदल दिसतो जाणवतो तेव्हा सरळ आपल्या मार्गाने चालत रहा कारण परत त्यांनी कधीच आपली विचारपूस करणार नाहीत आणि कधीच चुकुन काही संदेश फोन आला तर तो चुकून लागला असेल आणि अस चुकून घडतं असं घडेलचं अस काही नाही म्हणून हुरळून जाऊ नका.. कारण काही क्षण देणारा आनंद नंतर फक्त दुःखच देवून जातो हे लक्षात ठेवा कारण असं प्रत्येका सोबत घडतं असतं तर तुम्ही त्याला अपवाद ठरू नाही शकतं..


        कोणी आपल्याला तू निघून जा सांगण्याची वाट बघत बसू नका फक्त कोणत्या गोष्टीचा गाजावाजा न करता सरळ निघून जा आणि नवीन आयुष्याची सुरुवात करा आणि पाठी वळून पहा तुमचं कुठुंब तुमच्या आज ही सोबत आहे उद्याही असणारं आहे आणि कायम राहिलं त्यांना एक वेळ तुम्ही राहिला काय नाही याचा फरक नाही पडणार पण तुमच्या कुटुंबाला नक्की फरक पडेल आधी तुमच्या घरचे मग सगळी लोकं हे कायम लक्षात ठेवा अश्या लोकांना आपल्या विचारा मध्ये ही जागा देऊ नका आणि त्यांची कमी पडेल म्हणून डोळ्यातून अश्रु ही काडू नका.. तुमचे आयुष्य खूप मौल्यवान आहे हे कायम लक्षात ठेवा आणि स्वतःची नेहमी काळजी घ्या कोणा साठी नाही स्वतः साठी खूष रहा.. अश्यानेच तुम्ही शहाणे व्हाल आणि ही तर खूप छोटी लढाई होती पण अजुन खूप अशा लढाईचा सामना तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या साठी त्या बाप्पाने कोणी ना कोणी बनवले आहे हे कायम लक्षात ठेवा..


Rate this content
Log in