Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Bhagyashri Chavan Patil

Drama Inspirational


4.0  

Bhagyashri Chavan Patil

Drama Inspirational


असं का होतं..??

असं का होतं..??

4 mins 201 4 mins 201

आज काल हा प्रश्न खूप जणांना पडत आहे पण उत्तर काही केल्या मिळत नाही आहे. सगळीकडे उपदेश आहेत पण उपाय मात्र कोणाकडेच नाही.. असं का होतं हे एकदा स्वतःला प्रामाणिकपणे विचारा बघा काही उत्तर मिळतं का?? कारण आपण असं का होतं हा प्रश्न पडला की आपली धाव ही दुसऱ्यापर्यंत जावून पोहोचते.. जेव्हा की उत्तर हे आपल्या कडेच असतं...


कोणी एक व्यक्ती दररोज न चुकता तुमच्याशी बोलतो आहे फोन करतो आहे संवाद साधतो आहे कधी कधी आपण इतके त्यांचा विचारही करत नाही तेवढा ते विचार करतात आणि परत एकदा का नवीन मैत्रीमधली गोडी संपली की लगेच एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखे वागू बोलू लागतात. जसं की आम्हीच पाठी गेलो होतो आमच्याशी बोला आणि दररोज आमची माहिती यांना द्या... हेच का जेवण तेच का नाही असंच का केलं तसंच का नाही... वगैरे वगैरे... जसं की आमचं आयुष्य नसून हे त्यांच्याच मालकी हक्काचे आहे कसही वागा कसही बोला कोण आहे विचारणार..


आम्ही भोळे सांभ त्यांनी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणून वागत बोलत राहतो त्यांची मर्जी सांभाळू लागतो. मग हळू हळू का होईना सवय ही लागते मग सगळं अवघड होऊन बसतं. मग आपल्याला काहीच करता येत नाही. आपल्याला तर आभाळ ठेंगणं झालेलं असतं की इतक्या दिवसात कोणी असा मित्र/मैत्रीण मिळाला/ मिळाली नाही त्या साठी आहे त्या माणसांना विसरून यांच्या पाठीमागे सगळा वेळ जातो. जणू डोळ्यावर पट्टी बांधली असते ज्यामुळे दिसायचे ही बंद झालेले असते. सगळा हा देखावा असतो जे आपल्याला कळत असतं पण वळत मात्र नाही. त्या वेळची वेळ आणि परिस्थितीनुसार वागणं भाग पडत जातं आणि कळत तर त्याहून नाही कारण एखाद्या स्वप्नासारखं सगळं घडत असतं ज्यातून कधी बाहेर येवूच नये असं वाटत राहतं ते दिवस ही संपूच नये असं वाटतं आणि त्यात चूक दोघांची असते कारण जग म्हणत टाळी एका हाताने वाजत नाही..


आयुष्याचा जणू सिनेमा सुरू आहे असं वाटतं. सुरुवातीचे काही दिवस इतके भारी आणि कमाल असतात की मन आनंदाने नाचू गाऊ लागत सतत चेहऱ्यावर हसू आनंद असतो सगळं वातावरण अगदी मस्त वाटू लागतं. भांडण होतात रुसवे फुगवे होतात. त्यासाठी ही जीवाचा आटापिटा केला जातो तेव्हा कुठे रुसवा कमी होतो आणि त्याच्या सवयीवर दिवस रात्र विचार केला जातो. कारण तेव्हा कानाला आणि तेच ऐकायला आवडत असतं आणि नंतर त्यांच्यावर गाणी ही आपोआप सुचू लागतात काही कविता ही बनू लागतात ज्यात प्रेमाचा नुसता वर्षाव होतो आणि घरच्यांचा कधी फोन आला तर एका रिंगमध्ये नाही उचलणार तर त्याचा/तिचा फोन मात्र रिंग वाजायच्या आधीच फोन कानाला असतो जसं की खूप महत्त्वाचं बोलणं होणार आहे असं... याच वागण्याला आज कालची पिढी वाहवत चालली आहे आणि हे आपल्या लोकांना लपवून सगळं चालू असतं. तशी त्यावेळी भुरळ ही पडलेली असते पुढे काय होईल काय होणार नाही याचं ही भान उरत नाही लक्षात असते ती वेळ आणि ती व्यक्ती बाकी काहीच डोळ्यांना दिसत नाही आणि कानाना ही ऐकू येत नाही अशी विचित्र अवस्था होऊन बसते आणि पुढचं काहीच कळत नाही..


मग थोड्या दिवसांनी परत असंच सगळं होत असतं पण अचानक हा संवाद साधला जात नाही. काही नाही तर हजार कारण तयार होतं असतात न बोलण्याची मग सुरू होते ती टाळाटाळ मग तेव्हा कुठे डोळे उघडायला सुरुवात होऊ लागते पण मनाला ते काही केल्या पटत नाही मग स्वतःहून बोलायचं काही तरी कारण काढून संवाद साधन्याचा प्रयत्न करायचा दिवसातून येणारे शंभर फोन आता एका फोन ही ते महाग होतात मग सगळच बदलत जातं स्वप्नात असणारे आपण एकदम च जमिनीवर येऊन कोसळतो पण तेव्हा तो सांभाळणारा हात कुठेतरी गायब होतो नंतर त्याच आयुष्य आणि त्याची वेळ हीच सर्व काही बनली जाते ज्यात आपल्याला थोडी ही जागा मिळत नाही तेव्हा कुठे तरी वाटत अस का होतं..?? 


याचा अर्थ एकच असू शकतो त्या वेळी तुमची गरज होती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पण आता ती गरज उरत नाही म्हणून काही क्षणात आपण एक अनोळखी व्यक्ती म्हणून जगतोय असा भास होतो काही जणांना मागचं मागे सोडून सहज पुढे जाता येतं पण काही जणांचं मन गुंतलेलं असतं त्यांना मात्र खूप कठीण जातं पण यातूनही खूप काही शिकायला मिळतं. कारण जो अर्ध्यावरती सोडून जातो तो आपला कधीच नसतो मग नातं कोणतंही असू दे सगळीकडे हाच उपाय लागू होतो. जमेल तितकं त्या माणसांपासून लांब राहायचं कारण पुढे खूप सारं आयुष्य पडलं आहे जे कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने थांबत नाही ते चालूच राहतं. त्यामुळे त्या काळातून बाहेर पडायचं कारण तेच एक कारण आपलं आयुष्य घडवणारं असतं. कारण त्या लोकांना आपण असलो काय आणि नसलो काय काहीच फरक पडत नाही कारण त्यांना सरड्या सारखा रंग काही क्षणांत बदलता येतो. त्यांचा परत आपल्या आयुष्यात येऊन काहीच फायदा नसतो आणि झालाच तर अमूल्य भावनेचा तोटा होतो..


म्हणून कधीही असं का? हा प्रश्न पडला की थोड्या वेळ एका जागी शांत बसा आणि विचार करा जो माणूस अचानक येतो काय आणि जातो काय याचा आपल्या आयुष्यावर काही परिणाम होणार आहे का?? कारण इतकं सोसल्या नंतर परत तुम्ही ती चूक कधीच करणार नाही फक्त त्यांची काहीतरी अडचण असेल असं समजून घ्या आणि त्या लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि जमलच तर यातून काहीतरी शिका असे हजारो लोक तुम्हाला भेटतील काही थोड्या काळाचा आनंद देतील तर काही एखाद्या वाहणाऱ्या पाण्या सारखे निघून जातील दोष कोणालाच द्यायचा नाही जमलच तर काहीतरी नाविन शिकायचं कारण दोष दिल्याने माणूस परत परत तिथेच अडकला जातो आणि एकटा पडतो आणि तेच जास्त हानिकारक असतं वेळीच शहाणे व्हा.. चुका करा पण नवीन चुका करा त्याने माणूस म्हणून घडण्यात मदत होते आणि पुढचं आयुष्य छान मार्गी लागत..


Rate this content
Log in

More marathi story from Bhagyashri Chavan Patil

Similar marathi story from Drama