Bhagyashri Chavan Patil

Children Stories Drama Inspirational

4  

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Drama Inspirational

आजी माझी लाडाची

आजी माझी लाडाची

3 mins
448


आज एकदम पोरक झाल्या सारखं वाटलं कारण आजी ला आई म्हणायचे आणि माझ्या नंतर प्रत्येक जण तीच हाक मारायची डोक्यावर पदर कपाळावर ठसठसित कुंकू जरीची साडी आणि हातभार बांगड्या अगदी मायेचं छत्र आणि देवीच शांत रूप आवाजात एकदम खमके पणा तितकाच गोडवा ओठावर असायचा संसार एक हाती कधीही तक्रार न करता केला आणि करायच्या भांडी कुंडी अगदी लक्ख म्हणजे एकाद्याचा चेहरा स्पष्ट दिसेल अशी भांडी असायची साड्या वर अतोनात प्रेम आणि साधी राहणी उच्च विचारसरणी याच उत्तम उदाहरण हिशोब अगदी पक्का आणि दर महिन्याला बाजार भरण आणून ठेवणं निवडण पाकडण आणि डबे नेहमी भरलेले असायचे लक्ष्मी पाणी भरते हे त्यांच्या रुपात मी पाहिलं..

         माझं आजोळ कोल्हापूर मला दोन मामा मामी एक मावशी आणि माझी आई त्यांच शिक्षण पूर्ण केलं अभ्यास करा हे सांगायचे सगळं त्यांचं नीट केलं पुढे संसार लग्न बाकीची सगळे सण वार केले आज चौघेही सुखात आहेत हेच पाहून त्यांना शांत वाटायचं आणि बाकीची ८ नातवंड सुखावणारी गोष्ट म्हणजे मी पाहिलं इथलं (कोल्हापूर) बाळ आई बाबा म्हणून हाक मारत नातवंडं या नावाचा मान दिला याचा वाटणारा आनंद गगनाद मावण्या सारख्या असायचा बाकीच्या ही त्यांच्या गोष्टी त्यांचं मनातलं आणि त्यांचं असणार नात काहीस वेगळं असणार हे नक्की प्रत्येकाना आपल्या परीने काही ना काही देत आणि तेच आमच्या बक्षिसा सारखं वाटायचं.. 


        असं म्हणतात ज्याच्या घरा समोर चपला जास्त तो खरा श्रीमंत माणूस त्यात आमचे आई बाबा पहिल्या नंबर वर असायचे सगळं काम चोख झालेलं आवडायचं उपास तपास अगदी काटेकोर आणि नियमात पाळायचे अगदी शेजारी पाजारी विचारायला यायचे की रिती रिवाज कसे नियमाने पाळायचे गला तरी इतका गोड की गाणी ऐकायला आवडायची.. प्रत्येकावर अतोनात प्रेम संध्याकाळचे दारात बसणार प्रत्येक जण बोलणार विचारपूस करणार ही सवय नेमाची आणि जेवण करण्यात अगदी अन्नपूर्णा साधं जेवण अगदी मन तृप्त होणार अश्या माझ्या आजी.. आजी नाहीच खरं तर आई


        आधीच आडनाव भोसले आणि आईना ५ भाऊ आणि 2 बहिणी त्यात आई एक पण सगळ्या भाच्या लेकी सुना नातवंडे यांचं आमच्या आई म्हणजे त्यांच्या मामी आत्यावर जीव हेच ऐकताना अप्रूप वाटायचं प्रत्येक जण येणारा मुखी कौतुक घेवून यायचा आणि जास्त ओडा दानोळी कडे होता माझं जाणं सुद्धा आई बरोबर च झालं होतं अगदी छान आणि डौलारू घर अजुन ही ते चित्र डोळ्यासमोर येते आई कडून खूप गप्पा गोष्टी ऐकायचे सगळं अगदी गोष्टीच्या पुस्तका सारखं वाटतं पण सांगताना नेहमी कौतुक सांगायचे म्हणजे आईचे शब्द आपण कोणाच वाईट करत नाही देव आपलं वाईट करत नाही हेच किती खरं असेल हे पटलं आणि जाणवलं..

         मायेचं छत्र हरपले आज सगळी कडे शोधलं तरी दिसत नाहीत देवाचं रूप मी कोणी बघितले का असं विचारलं तर मी सांगेन हो मी पाहिलं आहे हसताना घरात वावरताना खडतर संसार केला पण अगदी सहज शक्य होईल असा नेहमी चांगला विचार करायचा तर आपलं ही नेहमी सगळं चांगलच होणार पोरीची जात असेल तर तिने घर काम बाहेरच काम आणि संसार नीटनेटका करणे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची विचारपुस आणि पोटभर खायला देणं कधीही माणूस घरी आला आणि मोकळ्या हाताने गेला अस कधीच झालं नाही होणार नाही अजुन ही खूप काही किस्से गोष्टी आहेत पण वेळेची मर्यादा आणि मनात खूप आहे पण शब्दात लिहन तस अशक्य माझ्या सारखं सगळ्यांना आजी म्हणजे काय हे कळाव म्हणून हा लेख लिहला आहे..


लाडकी नात



Rate this content
Log in