कथा माझ्या थोरल्या धन्याची
कथा माझ्या थोरल्या धन्याची
आली होती ती सुंदर सोन्याची पहाट अचानक झाला होता तो अचानक विजांचा लखलखाट त्यात ढंगाचा होत होता गडगडाट सगळीकडे पसरला होता एक वेगळ्या शांततेचा शुकशुकाट अश्या वेळी आई तुळजा भवानी मातेच्या मंदिरात शिवनेरी गडावरजन्मला हो शिवाईचा पुत्र शिवाबा जो करणार अवघ्यामोगलाईचा नायनाट अशे थोर स्वराज्याचे वरदान आणि गरीब जनतेचे होणारे आई आणि बा आणि सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्या थरारली आणि शिवनेरीची तोफ एका आवाजात कडाडली सौदामिनी आसमंत दणाणून आला वाऱ्याची मंद झुळूक दर्या खोऱ्यात दरवरली.जिजाऊ पोटी राजा अवतरला आणि नगारा वाजला शाहिरी साज चढवला डंका डोंगरा आड सांगत सुटला आणि हीच गोड बातमी ऐकून सगळी रयत भारावून गेली जिजाऊ मातांचे संस्कार लाभले..
बाळाला तसाच हा शिवसूर्य हळूहळू मोठा होऊ लागला इवल्याशा पावलांनी दुडू दूडू धाऊन सगळ्याचा लाडका शिवबा झाला तसच इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहिलं होतं तसच हिरव्या दगडावर आता भगव रक्त स्वराज्याच इतिहास कोरत होतं आणि मोघालाईचा अंत जवळ येऊन ठेपला दादोजी कोंडदेव होते संगतीने म्हणुनी मिळाले शिवबास लढाईचे शिक्षण लहानग्या वयात तेजस्वी पुत्र महान झाले राजे शहाजी राजाचें पुत्र थोर पण जिजाऊ ते पुत्र ती आई नसूनी त्यांची सखी आणि सर्वकाही त्याच्याकडूनच शिकले मोठे झाले.. मुघलसम्राज्याचा काळ भयंकर कारण रयतेला जगणे झाले कारण माणसे नसुनी होते ते हैवान हाल हाल करुनी मारले जगणे आमचे नकोसे केले राज्याची दरबारी होतो म्हणुनी होता पूर्ण विश्वास होणार त्या मोघलाईचा नाश आम्हला कोणी नडले..
त्याला हत्तीच्या पायाखाली तुडविले याच काळात खान आणि शिवरायांची भेट प्रतागडावर त्या दोघांची भेट झाली हेच युद्ध युग युग लोटली तरी लक्षात राहिली कारण तो अफजल खान ही कम हुषारीचा त्यानं राजांवरती गळा भेट म्हणून दगा गेला आणि तितक्यात
महाराजांनी वाघनखे खुपसली आणि कोतला बाहेर काढला आणि जिवा महाला होता संगती म्हणुनी राजे म्हणतात होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी भेट रंगली साऱ्या महाराष्ट्रात घोउदोड सुरू झाली आणि पन्हाळा गडावर वेडा घालून त्या शाहिस्ते खानची बोटे छाटली आणि शनिवार वाड्यात त्याची फसगत केली साथीला घेऊन तानाजी मालुसरे बाजी प्रभु देशपांडे त्यांनी महाराजांसाठी आपले प्राण अर्पण केले आन दिला विश्र्वास रयतेला अशीच साथ ह्या जिवा भावाच्या माणसांनी दिली आग्र्याची सुटका औरंगाच्याची हार होता संगती होता मावळ्यांची साथ म्हणुनी राजं आणि बाळ राजे झाले पेटाऱ्यातून पसार झाले
तसेच मावळ्यांचे बळ कुशल सरदार तिथेच भेट आणि सुटका झाली आणि मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्याची कोवळी येणारी थंड झुळूक दऱ्या खोऱ्यात दरवळली जिजाऊ पोटी मराठ्यांचा राजा अवतरला सांगत मुकी पाखरे किलबिलली झाडे फुले फळे सुध्दा बोलू गाऊ लागली नगारा वाजला, शाहिरी साज चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर मराठी शाहीचा भगवा झेंडा फडकला मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार आणि माझ्या राजाचा थाटामाटात राज्याभिषेक सोहळा आनंदात पार पडला महाराष्टाच्या मातीमधूनी आणि
प्रत्येक कोपऱ्यातून आवाज ऐकू येतो तो मराठी भाषेचा सह्याद्री रांगामधूनी सूर्य उगवतो मराठी अस्मितेचा संवाद मराठीचा संस्कार शोभून दिसले तेजोमय माझ्या राजाचा रणांगणात गर्जतो शिव शंभू यांच्या पराक्रमाचा आणि होतो जयजयकार माझ्या राजांचा साज शृंगार प्रेम दिसते ते माय मराठीचा नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा त्यात आहे शिवबाची ज्योत प्रत्येक मावळा आपल्या ह्रदयी तेवत ठेवतो आणि ओठांवरती नावं येताच अभिमानाने प्रत्येकाचा उर भरून येतो आणि अलगद अंगावरती काटा उभा राहतो चहुकडे पसरली माझ्या शिवरायांची गाथा तुमच्या आमच्या मनातील दूर होणार आता व्यथा आज तुमच्या चरणी नतमस्तक होतो