Bhagyashri Chavan Patil

Children Stories Tragedy Inspirational

3  

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Tragedy Inspirational

वर्ष उलटून गेलं...

वर्ष उलटून गेलं...

3 mins
290


वर्ष उलटून गेल पण आठवण काही केल्या जात नाही आज ही तो बाबांचा चेहरा आठवतो अंगावर वर नेहमी पांढरा शुभ्र सदरा आणि पांढरी विजार हातात नेहमी पणाची बॅग त्यात अडिकत्ता पान सुपारी असायची आणि बॅग मध्ये पेन आणि डायरी असायची आणि त्यांचे अक्षर एकदम मोत्या सारखे होते आणि त्याची आठवण माझ्या कडे आहे मी सहजच त्यांना माझ्या कवितेची वही दाखवली होती त्यात तु कवियत्री होणार असा म्हणून आशीर्वाद दिला होता त्यांची उंची सहा फूट रुबाबदार व्यक्तिमत्त्व आहे सगळ्यांशी मायेने बोलायचे सगळ्यांना सरकार म्हणून हाक मारत आणि अक्का आणि बाळ अशी नेहमी हाक असायची आज त्याची कमी जाणवते आजोबांनी एक चांगली शिकवण जगासमोर ठेवली विवाह संस्थेच काम त्यांनी हातात घेतलं आणि ते काम त्यांनी आपल कर्त्यव आणि समाज कार्य म्हणून केलं याचाच खूप कौतुक आहे त्याने नवीन नाती आणि माणसे जोडली गेली जी अजुनपर्यंत सगळे त्यांची आठवण काढत असतात..


बरं कोल्हापूरसारख्या शहरात त्यांनी स्वतःचं घर घेतलं आणि त्यांना आजोबांची साथ मिळाली म्हणून त्यांनी घराला नावं केशव स्मृती म्हणून दिलं अशी त्यांची धारणा होती त्यांच्या कडे लूना ही होती त्यावर आई बाबा खूप फिरले त्यात लग्न सोहळा आणि इत्तर नातेवाईकांकडे जान हेच काय कधी स्वतःसाठी वेळ नाहीच घेतला येणारा पगार घरच्या गोष्ठी आणि मुलांना नातवंडांना खायला नेत शरीर यष्टी ही खूप चांगली आणि महत्वाचे म्हणजे आजोबा निर्व्यसनी होते त्यामुळे त्यांचं कधीच कुठे अडलं नाही वायफळ खर्च आणि बडबड त्यांनी कधीच केली नाही त्यामुळे त्यांचं जीवन सत्कारणी लागलं याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि नेहमी वाटतं राहील..


रोज संध्याकाळी फिरायला जायला आवडायचे कॉलनीतला परिसर चांगला त्यामुळे मित्र परिवार ही चांगला होता सगळ्यांसोबत घरोब्याचे संबंध होते माणसाने आयुष्यात समाधानी कसं राहायचं हे सुद्धा त्यांच्या कडूनच आम्ही सारे शिकतच मोठे झालो आहोत माझी आई सुद्धा खूप काही सांगत असते बाबांच्या बद्दल त्यांचं राहणीमान आणि त्यांनी कोणासाठी काय केलं आजोबांना आठ बहिणी आणि आजोबा एकटे म्हणजे नऊ भावंडं होती बर आठ बहिणींची लग्न सुध्दा आजोबा आजी नी स्व खर्चानी केला चाळीत राहून सुद्धा चौघा मुलांचं शिक्षण आणि लग्न ही करून दिलं एकमेकांच्या साथीने पूर्ण केला मोजकीच माणसे झाली पण अश्या बऱ्याच लोकांना अपेक्षा न करता मदत करत राहिले आणि कधीच कोणाची घेता सेवा करत राहिले..


माणसांमध्ये देव माणूस असतो असं मी ऐकलं होतं त्याचं उत्तम प्रतीच वर्णन मी माझ्या अजोबांमध्ये पाहिलं निःस्वार्थ आणि जणू देवाचं रूप घेऊन आमच्या सोबत राहत होते. खूप साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती जे काही समोर आलं ते नेहमी गोडच मानून त्यांनी आयुष्याची वाटचाल केली त्यांच्या बद्दल हे लिहून मी कधी धन्य आहे हे सांगायचं आहे आणि माझे आजोबा किती महान होते हे सांगायचं आहे.. माणसाने कौतुक नेहमी दुसऱ्याच करावं आपल नाही असं म्हणतात आणि हा वाक्य प्रचार मी नेहमी आजोबांच्या बाबतीत ऐकत आले आहे आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि कायम राहील.. अजुन खुप काही आठवणी किस्से आहेत पण शब्द आणि वेळेची मर्यादा पाळून मी इथेच थांबते कारण मनात खूप आहे पण शब्द अपुरे पडत आहेत म्हणूनच माझ्या सारखंच तुम्हाला ही सगळ्यांना त्यांच्याबद्दल कळावं म्हणून हा लेख लिहला आहे..


Rate this content
Log in