Bhagyashri Chavan Patil

Others

4.0  

Bhagyashri Chavan Patil

Others

स्वतःसाठी असणं महत्वाचं

स्वतःसाठी असणं महत्वाचं

5 mins
361


HELLO, कशी आहेस राणी? काय सुरू आहे.. असं कधीच बोलले नाही मी स्वतःशी कधीच हे पहिल्यांदा होत आहे हां आता काही जणांन सोबत माझं पटत नाही आणि पटलं तर विचारायची सोय नाही आर या पार मग मी स्वतःचा विचार करत नाही पण हां तसं बरोबर नाही आहे समतोल राखला आला पाहिजेत आणि हे खरंच शिकण्या सारखं आहे.. 


आपण स्वतः कसे आहोत हे आपल आपल्याला माहीत आहे म्हणुन समोरचा ही तसाच असेल हे चुकीचं आहे जे मी आज पर्यंत करत आले कारण याने आपण स्वार्थी होतो आणि स्वतःच नुकसान करून घेतो आणि हे खरंच चुकीचं आहे कारण आपल्यात आणि समोरच्यात जमीन असमान चा फरक आहे कोणी कोणा सारखं नसतं हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे मग ना त्रास होतं नाही कशाचा आणि कधीच आपण म्हणतो आपण ओळखतो समोरच्याला ते साफ चुकीचं असतं कारण प्रत्येक जण वेगळा असतो मान्य सगळं काही किंवा त्यापेक्षा कमी सगळं सेम घडत असतं पेपर आहे तसाच असतो त्याची उत्तरे ही ही प्रत्येकाची वेगळी असतात आणि हेच समजत नाही म्हणून आपली फसगत होते आणि त्रास स्वतःला होतो.. प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आणि आयुष्य आहे हे आणि हेच खरं आहे त्याला ओळखतात ती ते त्याचे आई वडील भाऊ बहिण इतकेच काय ते आणि तिसरं कोणी नाही कारण यांची नाळ कायमची जोडली गेली असते एकमेकांच्या प्रेमाचे प्रतिक असतात ना म्हणुन नाहीतर नवीन नातं जोडणारा माणूस हा भावनिक गुंता गुंती मुळे जवळ आलेला असतो..


बाहेरच्या जगात राहता आणि वावरता यावं म्हणून मित्र आणि मैत्रिणी आहेत काही खास तर काही बोलून चालून राहणारे आहेत ह्यांचा वर हक्क फक्त त्यांच्या मनात असला तरच आपण तो हक्क गाजवू शकतो नाही तर नाही कारण वेगळा अस्तित्व असलेला माणूस आहे हेच खरं आहे.. काही जण ही रक्ताची नाती म्हणून निभवतात तर काही जण आपलं भल कशात आहे हे बघत असतात आणि प्रेम यातली नाती जरा जगा वेगळी आणि दुसऱ्या दुनियेत घेवुन जाणारी असतात पण ही नाती मृगजळा सारखी असतात किंवा भर वाळवंटात पाणी दिसतं पण ते खरं नसतं अशी असतात जर विधात्याने गाठ बांधून पाठवली आहेच तर लाखों मधली एक जोडी एकत्र येते नाहीतर मग नाही कारण माणूस हे कधीच मान्य करत नाही पण तेच आणि तेच खरं असतं बाकी काही नाही.. निःस्वार्थ प्रेम वगैरे काही नसतं ह्या साऱ्या गोड स्वप्ना सारख्या कल्पना आहेत ज्या खऱ्या होऊ देत असे प्रत्येकाला वाटते पण दैवा पुढे कोणाचं काही चालत नाही.. पृथ्वी गोल आहे म्हणून ही गाठ भेट होत राहते इतकंच काय ते कारण सत्य परिस्थिती काही वेगळी असते आणि आपण त्याकडे काना डोळा करतो कारण तो कदाचित आपल्या मनासारखे होत नाही असं वाटतं पण त्यात ही आपलंच भल असतं हे वेळ आली की कळतं..


म्हणून स्वतः कधी एकटे आहोत असं म्हणायचा आणि त्यावरून रडायचा हक्क तुम्हाला नाही तुम्ही जन्माला आल्या नंतर तुम्हाला एक नाव दिलं आहे त्या पुढे पाठीमागे कोणीतरी कायम आहे त्यामुळे एकटे वगैरे तुम्ही कधीच नसता त्यामुळे हे वाटणं मुळात चुकीचं आहे कारण कोणा साठी रडायला तो आपला हक्कानी असायला हवा तरच त्याला अर्थ आहे वाटणं आणि खऱ्या मध्ये तस असणं ह्यात खुप मोठा फरक आहे.. काही असतात वल्ली त्यांचं आयुष्य हे प्रेमाचं असतं कारण ते त्यांनीच बनवलेलं असतं म्हणुन बाकी त्याचा मोठा विचार असा नसतो.. मन आहे डोकं आहे त्याला सत्य परिस्थिती समजली पाहिजे आणि आता येवढं कळलं आहे तर हे ही कळेल स्वतःचे बनुन रहा आणि विचार ही उंबरठा असलेल्या आतल्या लोकांशी करा प्रत्येक येणारा जाणारा नाही कारण हा वाटसरू काही काळ आलेला असतो कारण प्रत्येकाचा मार्ग वेगळा आणि मोकळा असतो त्यात आपण असलो तर कदाचित खूप कमी वेळा साठी असतो नाहीतर नाही.. कारण प्रत्येकाला स्वतःच स्वतंत्र अस्तित्व आणि आयुष्य जगायचा हक्क आहे प्रत्येकाला त्याचे हक्क त्याच्या वाटचे प्रेम मिळणार आहे त्यामुळे आनंदी राहणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते बाकी दुसरा काहीच करू नाही शकत हे कायम लक्षात ठेवलं की मग त्रास होतं नाही आणि कधीच जवळीक आणि सवई च वाटलं तरी त्यातपूर्ती झालेली खरी गुंतागुंत असतं बाकी काही नाही आणि खुप होऊन ही असं जवळीक आणि सवय कोणाची झाली तर हे असं किती दिवस विचारायचं त्याचं उत्तर आलेल्या चांगल्या आणि वाईट अनुभवातून मिळतं तेवढं डोकं आणि मन देवाने आपल्याला दिलेलं असतं आणि जो आयुष्य भर सोबत करणार आहे त्याचा विचार करायचा आणि त्रास काळजी एकटे पण त्यांच्या साठी वाटून घ्यायचं पण असं काही होत नाही कारण इथे नाती जपण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथे सांगावं बोलावं लागतं नाही सगळं आपोआप घडत जातं मतभेद होतात पण दुरावा कधीच येत नाही राग येतो कधी कधी पण खरं प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही कारण ते नातं एका धाग्यात गुंफूलेल असतं आणि त्याची जबाबदारी ही दोघांनी घेतलेली असते आणि त्याला प्रेम असं म्हणतात.. 


राधा कृष्ण हे असे एकच होते त्याची तुलना सामान्य माणसाशी होणं निव्वळ अशक्य आहे.. कारण त्यांनी सुद्धा काही वचन पाळली आहेत म्हणुन त्यांच्या सारखं होणं शक्य नाही आणि जे काही क्षण दिवस महिना वर्ष राहतं आणि निघून जातं ते फक्त आकर्षण असू शकत कारण कोणी आपल्याला आवडणं हे आपल्या हातात नसतं म्हणुन ह्याला आकर्षण आणि हक्क समजणारे लोक या जगात आहेत जे काही अर्थाने चुक तर बरोबर आहे.. आणि आपल्याला पाहिजे असं वाटतं असतं पण देव आपल्याला जे पाहिजे हे देत नसतो जे बरोबर आहे ते देत असतो..माणूस इथे न मागता ही भरभरून मिळतं तेव्हा मृगजळ नाही खरं आयुष्य ज्यात हे सगळ घडत असतं.. कारण माणूस आपला असला की, कधीही तो वाट बघायला आणि काळजी करायला आणि तो तक्रारीची टोचणी आपल्याला कधीच बोचू देत नाही.. कारण जाणीव असणं गरजेचं असतं तरच ते नातं फुलत बहरत हे आले गेलेल्या तात्पुरत्या स्वरूपात आलेल्या वाटसरू बरोबर कधीच हे घडत नाही ते निव्वळ अशक्य असतं कारण तिथे जाणीव नसते फक्त वेळ सुंदर आणि हवं हवं असणाऱ्या स्वप्ना सारखं असतं म्हणुन जे वास्तवात त्याच अर्ध ही घडत नाही.. तेव्हा कुठे खरी नाती आणि त्याचा अर्थ नव्याने रोज उलगडत जातो आणि ह्या नवीन रोपट्याची वाढ ही होतं असते कारण हे आरश्या सारखं लक्ख असतं काही वेळा त्यावर जरा धूसर पणा येतो पण तो काही काळच असतो कारण त्याला भविष्य नसतं ना म्हणुन इथे समजुन घेणे महत्वाचे असते.. काही वेळ जाऊ दिला की परत पहिल्या सारखं स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागतं..


Rate this content
Log in