Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Inspirational

4  

Chandan Pawar

Inspirational

युगपुरुष

युगपुरुष

1 min
173


धन्य ते शिवराय

 रयतेसाठी देह झिजवला;

 शक्ती- स्फूर्तीचा जिवंत झरा

 मराठ्यांचा इतिहास घडवला.


 नीति- क्रांतीचे रक्त 

शिवबाचा अंगी पेरले ;

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न 

नयनी- मनी बाळगले .


मायेनं जमवलेली माणसं

 स्वराज्याचा खरं धन ;

शिवस्वराज्यासाठी प्राण देऊन

 वेचले आयुष्याचे क्षण .


टाच मारुनी घोड्याला

 शिवराय निघे मोहिमेला;

 दृढनिश्चयी शिवरुपाने 

धडकी भरे शत्रूला .


मानवतेची कास धरून 

घातली एकात्मतेची साद ;

शौर्य- शील- सुशासनाचा

 घुमे स्वराज्यात शंखनिनाद .


मंदिर-मस्जिद मूर्तीकेचे

पावित्र्य शिवरायांनी राखिले ;

सर्व जाती -धर्मसमभावाचे 

शिवस्वराज्य स्थापिले .


"जय भवानी" गर्जुनिया

 केला हिंदोस्तव साजरा ;

युगपुरुष शिवाजीराजास

 शतदा मानाचा मुजरा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational