STORYMIRROR

Mrudula Raje

Fantasy

4  

Mrudula Raje

Fantasy

युगांतर

युगांतर

1 min
1.1K

पाषाण युगातील आदिमानवाला चंद्राचेही वाटे नवल।

हा कनक गोल की आभाळामध्ये उडविला चेंडू धवल? ॥


कधी न केली कल्पना त्याने चंद्रास पकडण्याची।

शक्यताच नव्हती आभाळामध्ये पक्षासम विहरण्याची॥



भाला, बरची, हीच शस्त्रास्त्रे, घेऊनी हातात।

हिंस्त्र पशुंसवे लढणे, केवळ हाच पुरुषार्थ॥


ठाऊक नव्हते वाहन ज्याला, अन्य सोडूनी अश्व।

कुठून येईल कल्पना त्याजला, किती भव्य हे विश्व॥


मंगळ यानी बसून अवचित आला मंगळ-मानव।

समजेल कसा तो, " आहे हा कुणी देव, की दानव? ॥


भयभीत होऊन त्याच्यापासून करेल बचाव हा?।

किंवा मानून देव स्वर्गीचा पूजेल त्यास मनीं हा?॥


होईल का कधी मैत्री त्यांची, जुळेल का नाते?।

सारी सृष्टी होईल अचंबित , पाहूनी भरते प्रेमातें॥


अवचित यावा योग कधी हा, घडू दे मन्वंतर।

आदिमानवासम आम्ही पामर, वांछितो स्थित्यंतर॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy