युद्धभूमी
युद्धभूमी
डोळ्याला न दिसलेला शत्रु
ठप्प करून गेला जगजीवन
दोन हात करू म्हटले तर
कोणत्या युद्धभूमीवर उभे राहु?
वर वर दिसलेली शांतता
पोखरून गेले मन
डॉक्टरांकडे वार्या
रिकामा करून गेला खिसा?
युद्धभूमी कोणती
लढू त्यावर उभे राहून
बाहेर दिसलेली भूमी
कि आतील मनपटल?