STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

योग प्रार्थना...!

योग प्रार्थना...!

1 min
1.6K

कर जोडुनी तुला प्रार्थना

हे जगदीश्वरा

योगाभ्यासाची मनोकामना

सफल होऊ दे हे ईश्वरा...


सर्योपासना सुर्योदयी करितो

वंदूनी गुरूजना

तेजपुंज्य काया लाभो 

हे जगधीशा दयाघना...


सप्तचक्र पुलकित होण्या

अंग अंग नित्य श्रमु दे

योगा योगे तेज खुलु दे

हे प्रभाकरा...


हाती धरिल्या कार्याची

संकल्प सिद्धी सहज होऊ दे

मम कायेला वाचेला उन्नत

झळाळी लाभू दे हे विश्वेश्वरा...


योग साधना अन व्यायामाची

नित्य उपासना अखंड राहू दे

बलदंड शरीर अन सशक्त बुद्धी 

मज लाभू दे हे योगेश्वरा....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational