STORYMIRROR

Vrushali Khadye

Classics Others

3  

Vrushali Khadye

Classics Others

योग गीत

योग गीत

1 min
3.5K


किती सांगू मी सांगू कुणाला

आज जागतिक योग दिन आला

योगा करू चला,रोग पळवू चला

आला आला गं एकवीस जून आला

किती सांगू मी सांगू कुणाला...||धृ||


शाळेच्या पटांगणी,रस्त्याच्या काठी

योग शिक्षक अवतरले

सर्वांग व्यायाम,ध्यान नि प्राणायाम

योगाभ्यास करून घेतले

आळस गेला पळून,उत्साह आला भरून

मनशांतीचा अनुभव आला

आज जागतिक योग दिन आला

किती सांगू मी सांगू कुणाला...||१||


निरोगी तन गं, निरोगी मन

सुदृढ आरोग्याची पावती

कुणी करा ध्यान,कुणी करा आसनं

योगाचे प्रकार किती!

खुल्या हवेत चाला,मित्रासंगे पळा

सांज सकाळी जोडा व्यायाम शाळा

आज जागतिक योग दिन आला

किती सांगू मी सांगू कुणाला...||२||


सूर्यनमस्कार करा गं,आनंद भरा

व्यायामाचे रोज गिरवा धडे

होई तंदुरुस्त शरीर,लवचिकता अंगभर 

खेळात पाऊल पुढे

स्मरणशक्ती वाढेल,एकाग्रता जमेल

श्वासासोबत नामात रंगला

आज जागतिक योग दिन आला

किती सांगू मी सांगू कुणाला...||३||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics