योग दिन
योग दिन
"युज" या संस्कृत धातूपासून बनला "योग" हा शब्द
आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे असा होतो ज्याचा अर्थ
योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे,
भावनात्मक समतोल, अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची
ओळख करून देणार हे शास्त्र होय...
आरोग्य निरोगी आहे तर सर्व काही ठीक आहे
स्वास्थ्याला देऊ या आपल्या आयुष्यात पहिला क्रमांक
गोळ्या औषधांकरता लक्षात ठेवावी लागणार नाही
वेळ, दिवस आणि दिनांक...
चला तर योग करू या
रोग पळू या, स्वस्त राहू या,
आणि आपल्या जीवनाचा सदुपयोग करू या
म्हणतात ना योग असे जेथे आरोग्य वसे तेथे
स्वतःला बदलू या व्यायामाचे रोज धडे गिरवू या
स्मरणशक्ती एकाग्रता आपली वाढवू या
सर्वांग व्यायाम, ध्यान, प्राणायाम,
योगअभ्यास करून
आळस दूर पळू या
उत्साहाने मन शांतीचा
अनुभव मिळू या
कोणी करा ध्यान,
कोणी करा आसन
योगाचे प्रकार किती
निरोगी मन निरोगी तन
सदृढ आरोग्याची हीच
तर मिळेल पावती
पहाटे उठून पूर्व दिशेला गुलालाची उधळण पाहू या
भाव भरल्या मनाने धन्यवाद देवाला देऊन
खुल्या हवेत फिरायला जाऊ या
निसर्गाचे सुंदर रूप पाहून
ताजेतवाने होऊन मन प्रसन्न करू या
चला तर योग करू या जीवनाचा सदुपयोग करू या
सुख, शांती, समाधानाने हे जीवन आपले जगू या..
