येशील का?
येशील का?
माझ्या प्रेमाची व्यथा तू,
जीवनाची कहानी माझी कथा तू.
कुठे कुठे शोधू तुला
मिळनार का तू?
सांग ना रे राजा मला भेटशील का तू...
दरवळलेल्या श्वासामधली तू छोटीशी कहाणी,
त्या कहाणीमधली तुझी प्रिया मी दिवानी..
चमकणाऱ्या चंद्राची तू पहिली छाया
उन्हात पडलेल्या सावलीची तू
भरघोस माया...
माझ्या या आठवणीना उजाळा देशील का?
सांग ना रे राजा तु कधी येशील का?
सागरा किनारी बसून मी
वाट पाहील तुझी,
चमकणाऱ्या त्या चंद्राला पाहून
लाजेल मी जराशी सांग ना साथ माझी देशील का?
सांंग ना रे राजा तू येशील का..?
येऊनी माझ्या मिठीत,
प्रेमात पडशील का?
सांग ना रे राजा राजा तू कधी येशील का?

