STORYMIRROR

UMA PATIL

Romance

3  

UMA PATIL

Romance

बंध रेशमाचे (गझल)

बंध रेशमाचे (गझल)

1 min
26.8K


बंध रेशमांचे हे, निर्मिले विधात्याने

प्रेम नाव नात्यांचे, ठेवले समाजाने



हा कधीच सुटला ना, प्रश्न भाकरीचा रे

सांग तू जगावे का, या जगी गरीबाने



ना तुझ्याकडे आली, कोणतीच सत्ता ही

काय होतसे हासिल, बोल तू दबावाने



खुंटली जशी प्रगती, बेचिराख देशाची

पाठ फिरवली त्याला, मग तशी विकासाने



देश देव रे माझा, बोलला इथे सैनिक

फडकला तिरंगा तो, जिंकला जवानाने



जिंदगीत जिंके तो, जो खऱ्या मनाचा रे

काय मिळवले खोट्या, या तुझ्या स्वभावाने



तंत्र गवसले तुजला,शेर अन् गझलेचे

आत्मसात होई मग, मंत्र तो सरावाने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance