STORYMIRROR

UMA PATIL

Romance

3  

UMA PATIL

Romance

मी प्रेमदिवाणी

मी प्रेमदिवाणी

1 min
27K


कसे सांगावे तुला

मला काही कळेना

माझ्या मनाची बेचैनी

राजसा, समजून घे ना


पावसाळी वातावरण

हवेतला धुंद गारवा

मनात स्व्छंद नाचतो

माझ्या स्वप्नातला पारवा


पडे सोनसळी ऊन

दिसे रंगीबेरंगी इंद्रधनुष्य

एकमेकांच्या मिठीत आपण

सुखाने जगूया आयुष्य


असे लागले वेड तुझे

मी झाले प्रेमदिवाणी

जीवनाच्या पानावर लिहू

तुझ्या-माझ्या इश्काची कहाणी


तुझ्या प्रीतीत झाले धुंद

माझ्या गालांवर तुझा रंग

आपले प्रेम बहरावे सदैव

जन्मोजन्मी मिळावा संग


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance