STORYMIRROR

Anup Deshmukh

Romance

5.0  

Anup Deshmukh

Romance

तु

तु

1 min
27.1K


चंदेरी या चांदण्यात मी तुलाच शोधतो ,

वेचाया हे चांदणे तुझीच वाट पाहतो......


चिंब भिजतो मी पावसात श्रावणाच्या ,

बरसणाऱ्या हरेक सरीत मी तुलाच स्मरतो......


रुळतो गंधाळलेल्या या फुलांच्या बागेत मी ,

पाकळ्यांतही फुलांच्या मी तुलाच जाणतो.....


सुटता सुटेना बंध हे तुझिया प्रेमाचे ,

स्मरता तुला मी न माझा राहतो ......


दरवळते अस्तित्व हे रोज तुझे मजभोवती ,

मज कळे ना मी का एवढा तुझ्यात गुंततो .......


उरलेत फक्त प्रश्न तुझे मजभोवती ,

सागरात तुझिया प्रेमाच्या मी माझे तरंग शोधतो......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Anup Deshmukh

पाऊस

पाऊस

1 min वाचा

तु

तु

1 min वाचा

Similar marathi poem from Romance