आपण फक्त प्रेम करत रहावं...
आपण फक्त प्रेम करत रहावं...
आपण फक्त प्रेम करत रहावं...
नजरा नजर होत डोळ्यांची भाषा शिकत जावं..
भावना येत ओठांवरी, त्यात शब्दांची सांगड घालत रहावं..
कधी तिनं चंद्र सूर्यात त्याला शोधावं..
कधी त्यानं तिला ताऱ्यांच्या माळेत गुंफावं...
होकराच्या अपेक्षेत कधी त्यानं वाट पाहत रहावं..
तर कधी एकतर्फी प्रेमात तिनी त्याला दुरूनच पहावं...
कधी त्यानं तिच्या केसात मोगरा माळावा..
कधी कोणी आठवणीतल्या पाकळीला पुस्तक उघडून एकांती पहावं...
प्रेमात कोणी धडपडतं, कोणी जगाशी झगडतं, तर कोणी आकंठ बुडावं..
आपण मात्र प्रेमात खंबीर उभ रहावं...
प्रेमाच्या परिभाषेत,
हातात हात धरून क्षितिजापर्यंत चालत रहावं,
निवांत क्षणी रातीच्या, अलगद मिठीत रहावं,
एक हास्य दिलखुलास, मंत्र मुग्ध करून जावं,
जीव अडकलाय तुझ्यात असं सतत स्मरत रहावं...
ती व्यक्ती माझी झाली नाही झाली, तरी
समोरच्याच्या सुखात सुख शोधत रहावं,
आपण फक्त प्रेम करत रहाव...

