STORYMIRROR

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Romance

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Romance

पिंकी पिंकी व्हॉट कलर ?

पिंकी पिंकी व्हॉट कलर ?

1 min
21.3K


लहानपणी 'पिंकी पिंकी व्हॉट कलर ?'

मित्र मैत्रीण सोबत खेळताना

दंगा मस्ती करत

विविध रंगांशी केली होती दोस्ती !!!


लहानश्या आपल्याच दुनियेत

शोधले होते विविध रंग

कधी हसत, तर कधी रडत

घातला होता हैदोस !!!


'पिंकी पिंकी व्हॉट कलर ?'

'काळा' रंग म्हटल्यावर

आपल्याच डोक्यावर हात मारून घेत होतो

केसांचा रंग 'काळा' हे ओळखले करत हसत खिदळत होतो!!!


हळूच एकमेकांच्या कानात

आपल्या सभोताली असलेल्यांचे केस 'काळे' नाही

यावर करत होतो खुसपूस आणि

शिकत होतो आपल्याच अनुभवातून एकाच रंगांच्या विविध छटा !!!


मग पुढच्या वेळीस फुशारकीने

'पिंकी पिंकी व्हॉट कलर ?'

'म्हशीचा' रंग म्हटल्यावर

म्हशीला शोधात तिला हात लावण्याची धिटाई करत होतो !!!

'पिंकी पिंकी व्हॉट कलर ?'

करत करत शोधले होते

आपल्या सभोतालचे विविध रंग

कधी निसर्गातून… तर कधी अन्नातून !!!


कपडे घेताना आपल्या आवडीचा

रंग शोधताना घालत होतो गोंधळ

हा नाही ... तो नाही, असा हवा... तसा हवा

शब्दात मांडताना होत होती कसरत!!!


आता बऱ्याच रंगांची नावे माहिती झालीत

'पिंकी पिंकी व्हॉट कलर ?'

करत मलाच शोधायची हि नावे

निसर्गाच्यासानिध्यात जाऊन !!!


'मँगो डीलाईट ' हा रंग

अनुभवुदे पहिले आंबा पाहण्यात

मग अनुभवुदे

गारेगार 'आईस्क्रीम कँडी' खाण्यात !!!


'पिंकी पिंकी व्हॉट कलर ?'

करत पाहूदे ह्या निसर्गातल्या रंगांची दुनिया

खेळूदे मला हा खेळ परत परत

अनुभवुदे हि रंगांची दुनिया हसत खेळत !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance