आठवते का गं तुला....
आठवते का गं तुला....
आठवते का गं तुला....
आपली ती सागर किनारीची त्या बाकावरील पहिली भेट
नजरेला नजर न देता
लाजलीस तू
नि मी पाहत राहिलो तुझे थरथरणारे ओठ।
आठवते का गं तुला....
उसळत होत्या लाटा भरतीच्या
एकाच वेळी सागरात नि तुझ्या मनात
मी काही विचारण्या आधीच
तू आवेगाने मिठीत आली होतीस क्षणात।
आठवते का गं तुला....
तुझ्या माझ्या मिलनाची चाहुल
अनाहूतपणे पावसाला लागलेली
छत्री विसरल्याचा बहाणा करत
तू माझ्यासोबत चिंब भिजलेली।
आठवते का गं तुला....
सरींना झेलताना तू
देहभान हरपुन जायची
तुझ्या देहावरुन निथळणारे थेंब पाहुन
अगदी हरखुन जायची।
आठवते आहे आजही सारे मला....
तू म्हणाली होतीस की
पहिल्या भेटीला पाऊस आला
पण माझ्या मनात आजही आहे
पहिल्या भेटीचा मृदुगंध ओला।

