अजुन किती करू मी प्रेम तुझ्यावर
अजुन किती करू मी प्रेम तुझ्यावर
1 min
459
अजुन किती करू मी प्रेम तुझ्यावर
कधी ठेवणार गं तू विश्वास माझ्यावर
रोजच करतेस प्रश्न अन् उत्तरांचा गुंता
तुझेच नाव असते गं माझ्या अधरावर
कळणार कधी तुला तुझ्याविना जगणे व्यर्थ
असतेस तू स्वार तुझ्याच विचारांच्या धरेवर
आलाप अन् विलाप होवूनही प्रेम कळेना
वेळ अशी येवू नये कधीच कुणा वैऱ्यावर
चिढवतेस तू मला विहारणारा भ्रमर म्हणून
बघ एकदा केलेले जीवापाड प्रेम गुलाबावर
वसलीस तू माझ्या नसनसात अन् श्वासात
राधा अन् मीरा तूच ठेव विश्वास माझ्यावर..
