STORYMIRROR

Shila Ambhure

Romance

3  

Shila Ambhure

Romance

गुरुगाथा

गुरुगाथा

1 min
28.5K


मातपिता प्रथम ते

परिवार दूजा गुरु

अनमोल दिला ठेवा

नित्य तयालागी स्मरू।।1।।


देते ज्ञान परिसर

अनुभव महामेरु

गुरु मानुनि तयांना

सदा जोपासना करु।।2।।


ज्ञानपीठी गुरुजन

देती ज्ञान शिकवण

नितीमुल्ये संस्काराची

शाळा करी रुजवण।।3।।


नाना गुरु प्रत्येकास

वंदू तयांचे चरण

पुढे वाटूनि शिदोरी

करु सतत स्मरण।।4।।


गुरु जणू वरदान

गुरु वात्सल्याची मूर्ती

गुरु स्थान अबाधित

जगभरी त्यांची कीर्ती।।5।।


ज्ञान देऊनि मजला

केले बहु ज्ञानवंत

दिला आकार बुद्धिस

झाले आज बुद्धिवंत।।6।।


किती वर्णावा महिमा

सर्वश्रुत गुरुगाथा

शिष्या मी नतमस्तक

तयापुढे ठेवी माथा।।7।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance