STORYMIRROR

Satish Wadekar

Romance

3  

Satish Wadekar

Romance

प्रेम तुझे-माझे

प्रेम तुझे-माझे

1 min
27.9K


प्रेम तुझे-माझे, कळते मनाला ।

तरी दूर जाणे, छळते मनाला ।।


मेघ काळे येता, दाट आभाळात ।

तेव्हा तुझी वाट, पिडते मनाला ।।


अश्रूंनी बनली, धारा विरहाची

भेदून डोळ्यास, भिडते मनाला ।।


गर्द झाली पाने, गाती आर्त गाणे ।

आठवण तुझी, सलते मनाला ।।


चंद्र नि चांदणी, मला खुणावूनी ।

रात मग सारी, जाळते मनाला ।।


जरी विसरतो, तुझ्यात स्वतःला ।

विसरणे तुला, नडते मनाला ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance