प्रेमपाखरा
प्रेमपाखरा
चोरून तुझे बघणे,
अन लटकेसे लाजणे,
मज वेड्या प्रेमपाखरा,
जाहले सुरू प्रीत रुजणे.
बघता तुझे सौंदर्य,
तुजवरी फिदा झालो,
गेलो हरवून तुझ्यात,
मीच माझा न राहीलो.
प्रेमवेडा झालो तुझा,
तू माझी प्रेमपाखरु,
सांग तुझ्या प्रीतीत गं,
किती किती मी झुरु.
नजरेच्या या खेळात,
नको गं असे छळू,
बोल ना मनीचे गुज,
प्रेमाग्नीत नको जाळू.
खरं सांग गं एकदाच,
आवडतो का मी तुला,
रागवणार नाही गं मी,
माझ्या प्रिय प्रीतफुला.
नकार दिलास तरी,
तुझ्यावरच प्रेम करणार,
बोलली नाहीस कधी तरी,
दुरुनच तुला बघणार.
आयुष्यभर सुखी रहा,
हिच प्रार्थना आहे माझी,
प्रेमदेवता आहेस सखे,
सदा आठवण राहीन तुझी.

