STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Romance

3  

गोविंद ठोंबरे

Romance

तुझी चाहूल

तुझी चाहूल

1 min
26.3K


तुझी चाहूल वेगळीच होती
वेगळीच होती सारी आशा
नजरेतून चोरून गेलीस
अन बंद केल्यास दाही दिशा

तुझ्या चाहूल पावलांनी
तू पुसून घेतल्यास वाटा
मी हरवलेला वाटसरू अन
तू पेरीत गेलीस उरात काटा

तू निःशब्द झुळझुळणारे
झरे ही शांत केले
मी तहानलेला मार्गस्थ
तुझ्या चाहुली सर्व हरले

तुझ्या चाहूली तुझ्या पावली
नको आता ते गंध
मी उरात पाणी भरले आता
नको तुझे ते बंध


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance