STORYMIRROR

Sunjay Dobade

Romance

3  

Sunjay Dobade

Romance

मला तुझी आठवण आली

मला तुझी आठवण आली

1 min
30.1K


रंग नभाने बदलले जेव्हा,

मला तुझी आठवण आली.


पूर्वेच्या भाळावर रवीने

लाल गुलाल उधळला,

रक्तवर्णी कुंकुमाने तुझा

भालप्रदेश झाकोळला.

तीच लाली फिरूनी पुन्हा

तुझ्या ओठांवर आली,

मला तुझी आठवण आली.


पिवळ्या भंडाऱ्याने दुपारी

न्हाऊ लागल्या दिशा,

आभाळाला चढली मग

निळ्या नवलाईची नशा.

निळ्या विहिरीची खोली

नयनात तुझ्या सामावली,

मला तुझी आठवण आली.


मावळतीच्या मैदानात मेघ

नाना तऱ्हेचे जमले,

इंद्रधनुला साक्षी ठेवून

सप्तरंगी रंगात रमले.

मावळतीच्या डोहात मेघांनी

मुक्त जलक्रीडा केली,

मला तुझी आठवण आली


घोर काळ्या तिमिरात तारका

मिळूनी साऱ्या घालती पिंगा,

चंद्रासोबत मिळूनी अवघ्या

बहुत समयी त्या करिती दंगा.

थकून निजला निशाकर तो

रात्र काळी चंद्रकळा ल्याली,

मला तुझी आठवण आली



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance