STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance

3  

SANJAY SALVI

Romance

रानात सांग माझ्या कानात सांग

रानात सांग माझ्या कानात सांग

1 min
23.2K



रानात सांग माझ्या कानात सांग,

तुझ्या मनात गुपित दडलय का ?

सांग साजणी सांग मला तू,

तुझ्यात न माझ्यात काही घडलय का ?


तरारल शेत त्यात भरल कणीस,

माती आली ग पोटुस,

हे शेतकरी राजाला कळलय का ?

सांग साजणी सांग मला तू,

तुझ्यात न माझ्यात काही घडलय का ?


पाणी वरून पडल त्यान धरतीला चुम्बल,

हे कुणीतरी कधीतरी पाहिलंय का ?

सांग साजणी सांग मला तू,

तुझ्यात न माझ्यात काही घडलय का ?

नदी लागली धावाया तिचा समुंदर राया,

अस एकरूप होण कुणा जमलय का ?


सांग साजणी सांग मला तू,

तुझ्यात न माझ्यात काही घडलय का ?

चल आमराई जाउ गोड गोड गाणी गाऊ,

प्रेम मळ्यात फुलवू प्रीत जगाला कळवू,


सांग साजणी सांग मला तू,

माझाशी गोड गोड बोलशील का ?

सांग साजणी सांग मला तू,

माझाशी गोड गोड बोलशील का ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance