येरे येरे पावसा (बालकविता)
येरे येरे पावसा (बालकविता)
येरे येरे पावसा
तुला म्हणतो गाणे
आता तरी तू
जोरदार बरसणे
छत्री घेऊन मी
उड्या मारेल पाण्यात
पावसात भिजायला मजा
आले माझ्या ध्यानात
शाळा गळते आमची
शाळेला मिळेल सुट्टी
आम्ही सगळे पाणी खेळू
होईल कोणाशीतरी कट्टी
पाण्यामध्ये सोडू होडी
जाईल ती खूप दूर
नदे नाल्या भरून वाहतील
येईल त्यांनाही पूर
विजा चमकत असता
उजेड पडेल सगळीकडे
इंद्रधनुष्य आभाळात सुंदर
वाटते बघत रहावे त्याच्याकडे
