STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

4  

Yogita Takatrao

Inspirational

ये रे घना

ये रे घना

1 min
188


ये रे घना ये रे घना

भिजव मला तु पुन्हा

थेंब थेंब येऊ दे तुझा

स्पर्शु दे कायेला माझ्या 


ये रे घना ये रे घना 

छळू नको आता मला

बावरी मी होऊनी बघ

पाहते वाट तुझी सदा


ये रे घना ये रे घना 

सावर ही शुष्क धरा

असह्य होती तप्त झळा

कर तु वर्षाव थोडा


ये रे घना ये रे घना 

नटु सजु दे धरणीला

लेवो साज हिरवाई चा

फुलू दे रंगात नाना



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational