यालाच म्हणतात का प्रेम
यालाच म्हणतात का प्रेम
तिच्या आठवणीत वाढत जाणारी नशा
आणि फक्त तिच्या अस्तित्वाने खुळणारी प्रत्येक दिशा
यालाच म्हणतात का प्रेम ?
तिची क्षणक्षण कासावीस करणारी चाहूल
तिची हळुवार आठवण करून देणार
पैंजणाने सजलेले पाऊल
यालाच म्हणतात का प्रेम ?
तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास
मला प्रत्येक क्षणी होणार भास
यालाच म्हणतात का प्रेम?
तिच्या आठवणीने कासावीस होणार जीव
आणि सर्वात जास्त प्रेम करूनही
तिला ना येते माझी कीव
यालाच म्हणतात का प्रेम?
तिला जाणीव पण न होता झालेला स्पर्श
तिच्या नाजूक ओठावर उमललेला हर्ष
यालाच म्हणतात का प्रेम?

