STORYMIRROR

Anil Chandak

Classics Inspirational

3  

Anil Chandak

Classics Inspirational

या साठी कसुर नको प्रयत्नात

या साठी कसुर नको प्रयत्नात

1 min
527

या साठी कसुर नको प्रयत्नात* 


एकलव्यापरि लक्ष्य पाहिजे,

सतत आपल्या डोळ्यासमोर,

लक्ष्य भेदण्यासी ,एकाग्र मन,

कुशाग्र बुध्दी हवी,

जरी माहित असलं,अपयश येणार,


या साठी कसुर नको प्रयत्नात...........


कोण चुकत नाही,या जगात,

सारीच, तर चूकतात...


अपयश ,हीच यशाची,

असते पहिली पायरी,

पडत झडत ,अपमानित होतात,

तरी ही,,हार न मानता जिद्दीने,

फिनिक्स पक्ष्यांप्रमाणे,

राखेतून,उभी राहतात,


या साठी कसुर नको प्रयत्नात......


पायातल्या दगडाला,

कोणी नाही पाहत....

सारेच कळसाला बघतात...


यासाठी कसुर नको प्रयत्नात......


जिद्द पाहिजे ,शुन्यातून,

आपले, विश्व उभारायची,

बाजी लावुनी प्राणांची,


या साठी कसूर नको प्रयत्नात.........



हरणाऱ्याच्या नशिबी तिरस्कार,

जेत्याच्या भाग्यात पुरस्कार,

विजेत्याचा उदोउदो जगात,

हीच अवघ्या जगाची रित.....


या साठी कसुर नको प्रयत्नात........



आत्मविश्वाच्या बळावरती,

पंगु ही लंघयती गिरीम,

परिश्रम,अविश्रांत प्रयत्न

करावेच लागतात,

मगच होतो,गवगवा,

तेव्हांच मिळतो,जगात मान.....


या साठी कसुर नको प्रयत्नात..........



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics