व्यथा प्रेमी युगुलांची
व्यथा प्रेमी युगुलांची
अबोल प्रेम व्यक्त ना होई,
मनातल्या भावना कोणास दाखवी.
तू तिथे, मी इथे, कसे पाहू?
प्रेम माझे, मी तुला कसे देऊ?
कधी संपेल हे लॉकडाउन?
तोडून बंधन सारे, येईन धावून.
प्रिये, आता रहावत नाही,
मन माझे फक्त तुलाच पाही.
संक्रमणाची भीती दुरावा वाढवी,
कोरोना पूर्वीचे दिवस आठवी.
आठवे सजनी मोहक हसणे,
नखरे तुझे ते सुंदर बहाने.
कधी संपेल हा काळ सजनी,
रोमांच होई तुला भेटूनी.
प्रिये ठेव स्वस्थ आरोग्य,
पाळून कोरोना नियम योग्य.