STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा

1 min
311

वटपौर्णिमा सण येतो भाग्याचा 

आठवण पती पत्नी नात्याचा 

आयुष्य मागते आपल्या पतीला 

पत्नी नाते जपते सालोसालाला 


आठवण व्हावी तिची पतीला 

जिव्हाळा ठेवावा तिचा हृदयाला 

प्रेम,माया जपावे आयुष्याला 

विश्वासाचा संसार शोभावा जगाला 


वटपौर्णिमेचे व्रत समजून घ्यावे 

त्याचे मह्त्त्व चार चौघीला सांगावे 

आपसा आपसात भांडण नसावे 

सुखी संसारात समाधानी नांदावे 


नको अन्याय,अत्याचार स्रीवर 

विश्वास ठेवते आपल्या जोडीदारावर 

सात फेरे मारते वटवृक्षाच्या झाडाला 

जन्मोजन्मी हाच पती मिळो आपल्याला 


संशय,कल्लोळ कायम मिटावा 

दरवर्षी आठवणीना उजाळा मिळावा 

बारीक सारीक मतभेद मिटवावे 

आयुष्यात मनमोकळे सुंदर जगावे 


आयुष्य धन्याला खूप मिळावे 

जीवन निरोगी कायम असावे 

निर्व्यसनी त्यानी सदा रहावे  

कष्ट करून संसारी जगावे 


मागणे वटपौर्णिमेला मागणार 

वाईट चालीरीती मी सोडणार 

संस्कार, संस्कृती मी जपणार 

आदर पतीचा मी करणार 


पती पत्नीचे नाते असावे मित्राचे 

संसार आहे दोघांचा बिनधास्त जगायचे 

जरी दु:ख असले कितीही संसारी

हास्य असावे सदा चेहर्यावरी 


पावित्र्य जपावे पती पत्नी नात्याचे 

एकमेकांच्या भावनामय सुखदुखांचे 

भरभरून एकमेकांवर खूप प्रेम करावे 

त्याचा जगालाही हेवा वाटत रहावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational