STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

वसुंधरामाता

वसुंधरामाता

1 min
261


वर्षेतली वसुंधरा

वस्त्रे हरित लेऊनी

अलंकार फळे फुले

दिसे ती लावण्यखणी   (1)


सुंदरशा वसुधेला

कुणी दुष्ट दृष्ट लावी

टाके प्लँस्टिक कचरा

-हास पर्यावरणासी    (2)


सर्वजण लावू झाडे

जाणा कर्तव्य आपुले

राखू स्वच्छ परिसर

फुलवूया राने वने    (3)


मिळे हवा स्वच्छ शुद्ध 

दिसे परिसर छान

फळे फुले नटलेली

देई वसुंधरा दान     (4)


वसुंधरा जाणा माता

स्वच्छ सुंदर सजवू

पूज्य वसुंधरामाता

आजन्मचि ऋणी राहू   (5)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract