वसुंधरा
वसुंधरा
श्रावणात घन निळा बरसला..
ओल्या सरी घेउनी पाऊस आला
रुणझुण कानी भ्रमर सांगून गेला
गुणगुणत गारवा हवेत भिनला
थेंबाथेंबाने भिजली वसुंधरा
नव कांती ल्याली लाजली धरा
ओथंबुनी वाहिला तो पाऊस झरा
तृप्तीच्या दवात न्हाहली वसुंधरा
मन पाखरु घाली नभाला गवसणी
शालूत हिरव्या लाजली असे नव धरा
मोहरली नववधू नवांकुराने सजली जरा
मनाला मोहिनी घलिती बहरला निसर्ग सारा
तनामनाला तृप्तता गारवा भावाला मनाला
नटलेली नववधू ही हरत तृणंनी पहायला
मन पाखरू नभीचे जाहले क्षणाला
भारावली सृष्टी भुलली त्या श्रावणाला
मोहरली वसुंधरा बहर प्रीतीला आला
