STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

3  

Sunita Ghule

Inspirational

वसंत ऋतू

वसंत ऋतू

1 min
1.1K



वसंताचे आगमन

आगमन फुलोऱ्यात

चैतन्याचा शिडकावा

शिडकावा अंतरात।


कूहू कूहू कोकीळेचे

कोकीळेचे गीतगान

तप्त उन्हातही देई

देई आनंदाचं दान।


आमराई बहरली

बहरली तरूवेल

रक्तवर्ण पळसाला

पळसाला प्रीतफूल।


गंध,रंग उत्सवाला

उत्सवाला ऋतूराज

सण गुढी पाडव्याला

पाडव्याला नवा साज।


प्रतिकूल मोसमात

मोसमात चैत्रफूल

सुवर्णाच्या मुलाम्याची

मुलाम्याची रानभूल।


ऋतू वसंताचं धन

धन फुलते शिवारी

मन मन मोहरते

मोहरते काव्य भारी।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational