STORYMIRROR

Shila Ambhure

Fantasy

3  

Shila Ambhure

Fantasy

वसंत ऋतु

वसंत ऋतु

1 min
3.2K


ऋतुराज वसंत आला

आला नवतेज घेऊनि।

वसुंधरा करिते साज

साज नवतीचा लेऊनि।।


केशरी उधळीत उभा

उभा पलाश छानदार

मोहरला आम्रतरु तो

तो दिमाखात डौलदार।।


अंगणी फुलला मोगरा

मोगरा सुवासिक शुभ्र

पवन खेळतो आकाशी

आकाशी निवांत ते अभ्र।।


बागही सजली फुलांनी

फुलांनी आगळ्या रंगीत

प्रसन्न वाटते ऐकता

ऐकता निसर्ग संगीत।।


गुलमोहर निष्पर्ण तो

तो लाल फुलांनी सजला

आला ऋतुराज वसंत

वसंत आल्याचे वदला।।


झटकुन आळस सारा

सारा निसर्ग बागडतो

सृष्टीचा साजन वसंत

वसंत मज आवडतो।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy