कारण, बाप हा बापच असतो.
कारण, बाप हा बापच असतो.
एकेकाळी साबण लावून दाढी तो करतो,
निकाल लागल्यावर गुपचुप पेढे तो आणतो,
मुलाच्या आनंदात स्वतःचा आनंद तो पाहतो,
कारण, बाप हा बापच असतो.
मुलाच्या सर्व चुका पोटात तो घालतो,
मुलासाठी पूर्ण जागाच त्याग तो करतो,
वेळ आली तर स्वतः उपाशी राहतो,
कारण, बाप हा बापच असतो.
जगासमोर तो नेहमी आनंदात राहतो,
परिवारासोबत तो सदैव हसतो,
पण एकाटा असताना मात्र खूप रडतो,
कारण, बाप हा बापच असतो.
सर्व सोडून तो आहे त्या कपड्यावर येतो,
शून्यातून संपूर्ण जग निर्माण करतो,
आपल्या लहानश्या परिवाराची काळजी तो घेतो,
कारण, बाप हा बापच असतो.
बाप तर बापच असतो,
हा कवी बापासाठीच लिहतो,
बापासाठी कवी जग जिंकतो,
बाप हा बापच असतो.
