तुझ्याविना
तुझ्याविना
तुझ्याविना सखे,
या हृदयी वसंत नाही.
तुझ्याविना राणी,
या जीवनी बहार नाही.
डोळ्यात माझ्या आता ग,
अश्रू वाहत नाही.
सुकले ते नदीपात्र,
तुला का ते कळत नाही?
ये जवळी सजनी,
विरह हा सहन होत नाही.
विरहात तुझ्या ग प्रिये,
ही रात्र सरत नाही.
तू जवळी आलीस,
आता ग उसंत नाही.
हृदयी सखे आता या,
वसंत मावत नाही.
नयनात आता या,
विरहास जागा नाही.
तू सोबती असता,
प्रेम नदी आटत नाही.

