STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Romance Fantasy

3  

Ganesh G Shivlad

Romance Fantasy

"सावर रे मुकुंदा"

"सावर रे मुकुंदा"

1 min
301

सावर रे सावळ्या, 

कान्हा, कन्हैया मुकुंदा..!

हरवली ही, वेडी राधा, 

तुझ्या प्रेमात रे गोविंदा..!


ऐकुनी तुझी मधुर वाणी, 

पावन शीतल..!

रंगले तुझ्या रंगात, 

झाले रे, मी ही श्यामल..!


मुरली मंजुळ तुझी, 

गुंतला रे जीव श्रीहरी..!

स्वर पडताच रे कानी, 

झाले मी बावरी..!


मयुर पीस स्पर्श होता, 

उरी अंग शहारले..!

अंतरी पिसारा फुलूनी, 

गंध चंदनी पाझरले..!


तहानभूक हरली रे माझी, 

भक्तिरसात न्हाऊन..!

सहवासात माधवा तुझ्या, 

विसरले रे देहभान..!


तुझ्या मोहात रे मी, 

आता अडकले निर्मोही..!

तुला सोडून रे प्राणनाथा, 

मीच आता माझी नाही..!


हीच एक आस हरी, 

आता आहे माझे मनी..!

तुझे कोमल चरण रे, 

ठेव माझे हृदयस्थानी..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance