पक्षी उडून गेला...
पक्षी उडून गेला...
1 min
312
सारे कसे दुरावताना,
एकांत मित्र माझा..!
कुठे दूरांत ढळे तारा,
की..! त्याचाच सांगावा...! १.
उसनी किनार हसरी,
ल्यायले पोशाख दु:खाचा..
छिद्र..आत काळजाला,
कोणास ठाव त्याचा...! २.
तप्त उन्हांत..गुलमोहर,
पाहिला खुशाल हसलेला..
तोही! सुखांचा फक्त,
उसनाच भास झालेला...! ३.
हे कधी काळचे पाणी,
फुटे मधेच ह्या-त्सुनामी..
निष्पर्ण ह्या फांदीवरचा,
होता 'पक्षी उडून गेला'....!! ४.