वरूण
वरूण
जून महीना तू दडी मारून लपलास!
जुलै महिन्यात तू तूझे अस्तित्व दाखवलेस!
ऑगस्ट महिन्यात तू तूझे उग्र स्वरूप दाखवलेस!
शहरांना झोडपून काढलेस
शहरांना खेडीगावांना विळखा टाकूनी.
नजर कैदेत ठेवलेस!
जिथे पाऊस पाहिजे तिथे तू कोरडं ठेवलेस
तिथे तू दुष्काळ ठेवलास.
जिथे पाऊस बास तिथे तू ओला दुष्काळ केलास?
निती समोर तू असा का खेळ मांडलास!
वरूण राजा तू असा निष्ठूर नको होऊ रे!
असे तूझे उग्र रूप नको दाखवू रे!
