वर्ष 2020
वर्ष 2020
वाटलच नव्हतं कधी
असे वर्ष अनुभवता येईल
घरी बसून सर्वांना
काम करता येईल
वाटलच नव्हतं कधी
असे वर्ष अनुभवता येईल
घरी बसून विद्यार्थ्यांना
शिक्षण घेता येईल.
2020 मध्ये
सगळेच होते घरी ,
निघू नका बाहेर
कोरोना येईल दारी.
डॉक्टर,नर्सेस,पोलिस
कर्मचारी सगळेच लागले
कामाला , निघू नका बाहेर
हेच सांगितले जनतेला ...
लॉकडाऊन मुळे आपण
जीवन जगायचे शिकलो
घरातील वस्तू नीट
वापरायचेही शिकलो...
कोरोना मुळे माणसं
दूर राहणे शिकलीत
मास्क लावून बोला
हीच वाक्य ऐकलीत...
या वर्षी सर्वांनाच
अनेक अनुभव आले
घराच्या ओढीने
लोकं चालत गेले...
कसे गेले हे वर्ष
कळलेच नाही कोणाला
जगण्याचा खरा अर्थ
सांगितला जगाला...
