STORYMIRROR

Sanvidha Walle (Jain)

Classics Inspirational Others

3  

Sanvidha Walle (Jain)

Classics Inspirational Others

मी एक पान

मी एक पान

1 min
207

फाटलेल्या पुस्तकाचे 

हरवलेले पान मी

विखुरलेल्या पानांमधले 

पुसटशे शब्द मी...

गद्य मी पद्य मी 

कथेचा सारांश मी... 

पूर्ण मी अपूर्ण मी

आयुष्याचे वर्णन मी

वाट मी पहाट मी 

सागराची लाट मी

मंत्र मी तंत्र मी

दिशादर्शक यंत्र मी 

विचार मी अविचार मी

जीवनाचा सार मी

अर्थ स्वार्थ अन व्यर्थ मी

वेळ मी काळ मी

भावनांचा स्वर मी 

प्रश्न मी उत्तर मी

न कळलेले एक पुस्तक मी.... 

न कळलेले एक पुस्तक मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics