पाऊस
पाऊस
सोसाट्याचा सुटता वारा
पान,वेल ही डोलु लागले
गडगडाती आभाळ सारे
ढगांनी व्यापुन घेतले
निळे,स्वच्छ आकाश सारे
गडद रंगात न्याहून निघाले
विज कडाडून गर्जना केली
पावसाची टिप टिप झाली
कोसळूनी तो खाली अंगणी
माती हि न्याहुन निघाली
पहिला पाउस पहिला पाउस
मुले अंगणी धाउन आली
धो धो करती पाउस सरी
अंगावरती झेलू लागली
पहिला पाउस अंगणी झाला
मातीचा सुगंध आला
निळ्या आकाशी आड ढगांच्या
सूर्य डोकूनी बघू लागला
सात रंग रे इंद्रधनू चे
निळ्या आकाशी शोभून दिसले
हिरवळ ती गवताला आली
पान,फूले ही डोलु लागली
शेत,पीके ही बहरून आली
नैसर्गिक सौंदर्य पसरले
समाधान नभास झाले
बघूनी सुंदर सृष्टी सारी
पावसाने स्मित केले...
बघूनी सूंदर सृष्टी सारी
पावसाने स्मित केले.
