इंटरनेट चे युग
इंटरनेट चे युग
1 min
381
फेसबुक आणि इंस्टामुळे
माणसे झालीत दूर
खूप सारे लाईक हवे
हाच सर्वांचा सूर
दिवसभर व्हॉट्सॲप वर
खूप काही बोलतात
समोर असलेल्या
माणसावर दुर्लक्ष करतात.
रिल्सचे व्हिडिओ करणे
चालू असते दिवसभर
मीम्स मध्ये टॅग करून
हसवतात ते क्षणभर.
आजी आजोबा, आई बाबा
सर्वच झालेत शिकार
इंटरनेटच्या वापरमुळे
जीवन झाले बेकार.
चांगले- वाईट फायदे
समजेनाच कोणाला
मीच सर्वात हुशार
दाखवी जगाला.
